बीड : बीडमध्ये महिला दिनाच्या दिवशी संतापजनक घटना समोर आली आहे. बीडमध्ये पोलिसांकडूनच महिलेवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. रक्षा करणारेच भक्षक बनले असल्याचे घटनेतून उघड झाले आहे. महिला दिनाला सत्कार करायचं म्हणून सांगत महिलेला बोलावलं आणि हा प्रकार घडला.
गेवराई तालुक्यातील महिला काही दिवसांपासून कामासाठी पोलिस स्टेशनमध्ये ये-जा करत होती. त्यामुळे तिची पाटोदा पोलिस ठाण्याचे बीट अमलदार गडकरी यांच्याशी ओळख झाली होती. या दरम्यान त्यांच्या मोबाईल क्रमांकाची देवाणघेवाण झाली होती. याच संधीचा फायदा उचलत बीट अमलदार गडकरी याने महिलेला महिला दिनानिमित्त सत्कार असल्याचे सांगत बोलावले आणि एका घरात घेऊन जात तिच्यावर अत्याचार केले.
हेही वाचा : BMW पार्क केली, ड्रायव्हरला व्हिडिओ शूट करायला लावलं अन्… पुण्यातील ‘त्या’ ड्रामाचा शेवट कुठे ?
नेमकी घटना काय?
बीडमधील पाटोदा पोलिस ठाण्याचे बीट अमलदार गडकर यांनी महिला दिनानिमित्त कार्यक्रमासाठी एका महिलेला बोलावून पाटोदा येथील स्टेट बँकेच्या बाजूला असलेल्या घरात घेऊन त्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडल्याने पाटोद्यात खळबळ उडाली. गेवराई तालुक्यातील महिला मागील काही प्रकरणात पाटोदा पोलीस ठाण्यात ये-जा करीत असल्याने पाटोदा पोलीस ठाण्यातील बीट अमलदार उद्धव गडकर कर्मचाऱ्याच्या संपर्कात आली होती. यानिमित्ताने मोबाईल क्रमांकांची देवाणघेवाण झाली यातून त्यांच्यात संभाषण होत होते. या संधीचा फायदा घेत त्या कर्मचाऱ्याने महिला दिनाचे निमित्त सांगून त्या महिलेला पाटोदा येथे बोलावून घेतले होते. संबंधित महिला पाटोद्यात आली असता स्टेट बँकच्या बाजूला घेऊन जात महिलेवर बलात्कार केला.यावेळी महिलेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत बलात्कार केला. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास महिला तक्रार दाखल करण्यासाठी पाटोदा पोलीस ठाण्यात आली आणि स्वतः पोलीस निरीक्षकांसमोर हा प्रकार सांगितले आहे. दुपारी 1 वाजल्यापासून महिला पोलीस ठाण्यातच बसून होती घटनेची गांभीर्य पाहून पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हुनगुडे पाटील यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात भेट देत व तपासा संदर्भात सूचना केल्या. संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी बीड येथे पाठविण्यात आले.