सोन्याच्या दरवाढीचा वेग सध्या कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीयेत. दिल्लीसह देशभरातील सराफा बाजार आणि फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ नोंदवली जात आहे. सोमवारी (१० फेब्रुवारी) सोन्याने ऐतिहासिक उच्चांक गाठला. ज्यामुळे ग्राहकांना खरेदीवर खिसा रिकामा करावा लागत आहे. सोन्याच्या किंमतीत सुमारे १० टक्क्यांनी वाढ झाली असून ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, सोन्याच्या दराने प्रति १० ग्रॅम ८८,५०० रुपयांपर्यंत मजल मारली आहे.
हेही वाचा - शेअर बाजारात मोठी तेजी! गुंतवणूकदारांना अवघ्या काही तासांत साडे चार लाख कोटींचा नफा
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात स्टील आणि ॲल्युमिनियमवर नविन शुल्क लादण्याची घोषणा केली. त्यामुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले. यामुळे जगभरातील गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति औंस सोन्याची किंमत २,९०० डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे.
हेही वाचा - Global Market Crash : ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जागतिक शेअर बाजार कोसळले, आयात शुल्क वाढीचा जगभरात गुंतवणूकदारांना फटका
जागतिक बाजारात घडलेल्या घडामोडींचा परिणाम भारतीय बाजार पेठांमध्येही झाला आहे. सोन्याचे दागिने विक्रेते आणि किरकोळ विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यामुळेही देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमती वाढत आहेत. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव ८६,००० रुपयांवर पोहोचला असून वायदा बाजारात तो ८५,००० रुपयांहून अधिक झाला आहे. दरम्यान, वाढत्या मागणीमुळे दागिने विक्रेते आणि किरकोळ विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे.
दिवाळीपर्यंत सोने १ लाखाचा टप्पा पार करणार?
सोन्याच्या या उसळलेल्या दरामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. ज्वेलर्सच्या मते, “जर आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता कायम राहिली आणि डॉलर मजबूत होत राहिला, तर दिवाळीपर्यंत सोन्याचा दर १ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो.”
दरम्यान, २९ जानेवारी रोजी दिल्लीत सोन्याच्या दरात घरसरण झाली आणि किंमत ८२,८४० रूपयांवर पोहचली होती. या नंतर सोन्याच्या दरात घसरण झालेली नाही. उलट सोन्याचे भाव वाढत आहेत. आज सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅम ८८,५०० वर पोहोचले आहेत. म्हणजे सोन्याच्या किंमतीत ५ हजार ६६० रूपयांची वाढ झाली आहे.