Wednesday, August 20, 2025 04:35:41 AM

Indian UPI App : भारताला 'देसी काउंटर इन्ट्युटिव्ह यूपीआय अॅप'ची गरज; एसबीआयच्या अहवालातून स्पष्ट

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या एका अहवालानुसार भारताला पूर्णपणे स्वदेशी विकसित प्रभावी UPI अॅपची आवश्यकता आहे.

indian upi app  भारताला देसी काउंटर इन्ट्युटिव्ह यूपीआय अॅपची गरज एसबीआयच्या अहवालातून स्पष्ट

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या एका अहवालानुसार, परदेशात विकसित झालेल्या पेमेंट प्लॅटफॉर्मवर अवलंबून राहण्याऐवजी डेटाचा खऱ्या अर्थाने फायदा घेण्यासाठी भारताला पूर्णपणे स्वदेशी विकसित प्रभावी UPI अॅपची आवश्यकता आहे. या अहवालात असे दिसून आले आहे की, देशातील UPI इकोसिस्टमवर सध्या काही थर्ड-पार्टी अॅप प्रोव्हायडर्स (TPAPs) यांचे वर्चस्व आहे, ज्यामध्ये PhonePe, Google Pay आणि Paytm व्यवहारांचे प्रमाण आणि मूल्य या दोन्ही बाबतीत आघाडीवर आहेत. त्यात म्हटले आहे की, "डेटा वापरण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना देसी काउंटर इन्ट्युटिव्ह अॅपची गरज जास्त अधोरेखित करता येणार नाही".

जुलै 2025 च्या आकडेवारीनुसार, फोनपे हे यूपीआय क्षेत्रात स्पष्टपणे आघाडीवर आहे. या अ‍ॅपने 8,931 दशलक्ष व्यवहारांची नोंद केली. तसेच त्यांचे मूल्य 12 लाख, 20 हजार, 141 कोटी रुपये होते. गुगल पे दुसऱ्या क्रमांकावर होता, ज्याचे एकूण व्यवहार 6 हजार, 923 दशलक्ष होते. तर एकूण व्यवहार मूल्य 8 लाख, 91 हजार, 297 कोटी रुपये होते. पेटीएम तिसऱ्या क्रमांकावर होता, ज्याने 1 हजार, 366 दशलक्ष व्यवहारांची नोंद केली. त्याचे मूल्य 1 लाख, 43 हजार, 651 कोटी रुपये होते.

हेही वाचा : Gold Reserves: भारताला लागली लॉटरी; 'या' राज्यात सापडलं सोन्याचं घबाड; जाणून घ्या

यात Navi आणि super.money सारख्या इतर कंपन्यांनी खूपच कमी आकडे नोंदवले. Navi ने 23 हजार, 563 कोटी रुपये किमतीचे 444 दशलक्ष व्यवहार केले. तर super.money ने 9 हजार, 019 कोटी रुपये किमतीचे 253 दशलक्ष व्यवहार केले. अहवालात असे नमूद केले आहे की, काही अॅप्समधील व्यवहारांचे हे जास्त प्रमाण भारत-केंद्रित फिनटेक नवोन्मेषाला पुढे जाण्यास प्रतिबंधित करू शकते.

UPI इकोसिस्टम वेगाने वाढली आहे. तसेच डिजिटल पेमेंटमध्ये बदल घडवून आणला आहे. परंतु मजबूत, पूर्णपणे स्वदेशी अॅपचा अभाव डेटा नियंत्रण आणि नावीन्यपूर्णतेच्या बाबतीत दीर्घकालीन आव्हाने निर्माण करू शकतो. या अहवालात जागतिक मॉडेल्सचे अनुसरण करण्याऐवजी भारताच्या अद्वितीय आवश्यकतांवर लक्ष केंद्रित करणारे "देसी काउंटर इन्ट्युटिव्ह अॅप" तयार करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. भारत आपल्या डिजिटल आणि वित्तीय प्रणालींमध्ये डेटाचा वापर करण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना अशा अॅपची गरज जास्त अधोरेखित करता येणार नाही, असे अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा : Stock Market Update : शेअर बाजार तेजीत; तर 25 जुलैनंतर पहिल्यांदाच निफ्टी 25 हजारांवर

सध्या, UPI डेटा काही मोठ्या कंपन्यांकडे केंद्रित आहे. यापैकी बहुतेक प्लॅटफॉर्मवर मजबूत परदेशी मालकी किंवा प्रभाव आहे. अहवालात इशारा देण्यात आला आहे की, हे भारतासाठी दीर्घकाळात आदर्श ठरणार नाही, विशेषतः जेव्हा आर्थिक व्यवहार डेटा डिजिटल कर्ज, विमा आणि इतर फिनटेक सेवांमध्ये नवोपक्रमाचा एक महत्त्वाचा चालक म्हणून उदयास येत आहे. अहवालात असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, पूर्णपणे स्वदेशी विकसित केलेले UPI अॅप केवळ व्यवहार डेटा सुरक्षित ठेवण्यास मदत करेल असे नाही, तर देशातील फिनटेक नवोन्मेष भारताच्या गरजा आणि प्राधान्यांशी सुसंगतपणे वाढेल, याची खात्री देखील करेल.
 

                          

सम्बन्धित सामग्री