Loan Recovery: कर्जदाराचा मृत्यू झाल्यास कर्जाची फेड कोण करणार? काय आहे नियम जाणून घ्या
Loan Recovery: आजच्या काळात वाढत्या गरजांमुळं कर्ज घेण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. घर, गाडी, शिक्षण किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी लोक बँकांकडून कर्ज घेतात. बँका कर्ज देताना ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर आणि रिपेमेंट हिस्ट्री इतिहास पाहतात आणि त्यानुसार विविध योजना उपलब्ध करून देतात. मात्र कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यास त्या कर्जाची परतफेड कोण करेल की कर्जाची वसुली होणार नाही हा प्रश्न अनेकांना पडला असेल. अशा परिस्थितीत बँक कर्ज वसुलीसाठी काय नियोजन करते. हे आपण या लेखातून समजून घेऊयात...
काय आहेत कर्ज वसुलीचे नियम
जर कर्जदाराचा मृत्यू झाल्यास, बँक सर्वप्रथम त्याच्या सह-कर्जदाराशी (co-applicant) संपर्क करते. सह-कर्जदार असल्यास त्याला संपूर्ण कर्ज फेडण्याची जबाबदारी घ्यावी लागते. पण जर को-अप्लिकंट नसेल किंवा तो कर्ज फेडू शकत नसेल तर बँक गारंटरकडे (guarantor) वळते. गारंटर हा मूळ कर्जदाराच्या वतीने कर्ज फेडण्यास बांधील असतो. जर गारंटरही कर्ज भरण्यास नकार देतो किंवा सक्षम नसेल तर बँक मृत कर्जदाराच्या कायदेशीर वारसदारांशी संपर्क साधते आणि त्यांना कर्ज फेडण्याची विनंती करते.
हेही वाचा - हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये Service Charge द्यावा लागतो का? उच्च न्यायालयाने काय निर्णय दिला? जाणून घ्या
बँक कर्ज वसुलीसाठी काय कारवाई करू शकते?
जर कोणीही कर्ज भरण्यास सक्षम नसेल तर बँके शेवटचा उपाय म्हणून संपत्ती जप्त करू शकते. गृहकर्ज किंवा वाहन कर्जाच्या बाबतीत बँक त्या संपत्तीवर थेट कब्जा मिळवते. उदाहरणार्थ गृहकर्ज असल्यास मृत कर्जदाराचे घर जप्त करून त्याची विक्री केली जाते. वाहन कर्ज घेतले असेल तर गाडी जप्त करून लिलावात विकली जाते.
हेही वाचा - Personal Loan फेडले नाही तर काय होईल? बँक वसुलीसाठी कोणत्या पद्धती अवलंबू शकते? जाणून घ्या
पर्सनल लोनच्या (personal loan) बाबतीत परिस्थिती थोडी वेगळी असते. या प्रकारच्या कर्जासाठी कोणतीही मालमत्ता गहाण नसल्यामुळं बँक इतर मालमत्ता जप्त करून वसुलीचा प्रयत्न करू शकते. काही प्रकरणांमध्ये बँक थेट कोर्टात दावा दाखल करून वारसदारांना कर्ज फेडण्यास भाग पाडू शकते.