Sunday, August 31, 2025 05:40:35 PM

SBI कडून गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! बँकेने गृहकर्जावरील व्याजदरात केली कपात

SBI कडून गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँकेने गृहकर्जावरील व्याजदर कमी केले आहेत. यामुळे एसबीआयकडून गृहकर्ज घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

sbi कडून गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी बँकेने गृहकर्जावरील व्याजदरात केली कपात
SBI Home Loan
Edited Image

SBI Cuts Interest Rates on Home Loans: गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात कपात केली होती. आता या कपातीचा फायदा स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना दिला आहे. SBI कडून गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँकेने गृहकर्जावरील व्याजदर कमी केले आहेत. यामुळे एसबीआयकडून गृहकर्ज घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बँकेच्या या निर्णयामुळे कर्जावरील ईएमआय कमी झाला आहे. बऱ्याच काळापासून लोक गृहकर्जाचा ईएमआय कमी होण्याची वाट पाहत होते. 

हेही वाचा - घटस्फोटानंतर पतीकडून मिळणाऱ्या पोटगीवर पत्नीलाही कर भरावा लागेल का? कायदा काय सांगतो? जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने विविध कर्जांवर लागू असलेल्या बाह्य बेंचमार्क-आधारित कर्ज दर (EBLR) आणि रेपो लिंक्ड कर्ज दर (RLLR) मध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या एमपीसी बैठकीत रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 25 बेसिस पॉइंट्स (बीपीएस) कपात करून तो 6.50% वरून 6.25% करण्याचा निर्णय घेतला होता. आता बँकेचे सुधारित कर्जदर 15 फेब्रुवारी 2025 पासून लागू झाले आहेत. तसेच SBI ने मागील दरांपेक्षा सीमान्त खर्चावर आधारित कर्ज दर (MCLR), आधार दर आणि बेंचमार्क प्राइम लेंडिंग दर (BPLR) बदललेले नाही. 

हेही वाचा - सोन्यात गुंतवणूक करताना 'ही' पद्धत वापरा; कोणताही मेकिंग

ईबीएलआर म्हणजे काय?

EBLR म्हणजे बाह्य बेंचमार्क कर्ज दर. सर्व फ्लोटिंग रेट होम लोन व्याजदर बाह्य बेंचमार्कशी जोडलेले असतात. मागील EBLR होता: 9.15% + CRP + BSP जो 8.90% + CRP + BSP असा सुधारित करण्यात आला आहे. EBLR 0.25% (25 बेसिस पॉइंट्स) ने कमी करण्यात आला आहे. याचा अर्थ, EBLR लिंक्ड कर्जे असलेल्या कर्जदारांना कमी व्याजदरांचा फायदा मिळेल ज्यामुळे EMI कमी होतील.

तुमचा EMI किती कमी होईल?

समजा तुम्ही एसबीआयकडून 50 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे, तर तुम्ही सध्या 9.15% दराने व्याज देत आहात. समजा 20 वर्षांच्या कर्ज कालावधीत तुमचा मासिक ईएमआय 45,470 रुपये असेल. आता बँकेने व्याजदर 8.90% पर्यंत कमी केला आहे, त्यामुळे तुमचा ईएमआय 44665 रुपयांपर्यंत कमी होईल.
 


सम्बन्धित सामग्री