Wednesday, August 20, 2025 03:52:11 PM

कायदेशीर अडचणींमुळे आणिक आगारात 100 मिनी बस धुळखात

मुंबईची लाईफलाईन समजली जाणाऱ्या बीएसटीच्या बस गेल्या 3 वर्षापासून आणिक आगारात धुळखात पडून आहेत. मुंबईतील अरुंद रस्त्यांवर धावण्यासाठी बेस्टने तीन कंपन्यांना कंत्राट दिलं होतं.

कायदेशीर अडचणींमुळे आणिक आगारात 100 मिनी बस धुळखात

मुंबई: मुंबईची लाईफलाईन समजली जाणाऱ्या बीएसटीच्या बस गेल्या 3 वर्षापासून आणिक आगारात धुळखात पडून आहेत. मुंबईतील अरुंद रस्त्यांवर धावण्यासाठी बेस्टने तीन कंपन्यांना कंत्राट दिलं होतं. मात्र गेल्या 3 वर्षापासून या 100 पेक्षा जास्त बस धूळखात पडल्या आहेत आणि ह्या बसेस वर दाट झाडी उगवलेली पाहायला मिळते. या बसेस आगारात का उभ्या आहेत?

आणिक आगारात सुमारे 100 हून अधिक बसेस धूळ खात पडून आहेत. बसेस कंत्राटदार कंपनीला देण्यात आल्या होत्या. या बसेस तिथेच पडून राहण्यामागे कंत्राटदारांची थकबाकी आणि कायदेशीर अडचणी हे प्रमुख कारण आहे. या निष्क्रिय बसेसमुळे बेस्टच्या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या बसेस तर इतक्या दिवसांपासून पडून आहेत की, त्यांच्यावर दाट झाडी उगवली आहेत असे चित्र पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: सासरच्या मंडळींने सुनेला विकलं; यवतमाळमधील लाजिरवाणा प्रकार

एम पी ग्रुपच्या गाड्या आहेत आणि या गाड्या बंद स्वरूपात त्या ठिकाणी धुळखात पडल्या आहेत. त्या गाड्यांचा देखभालीचा खर्चही प्रचंड आहे. त्याचबरोबर त्या कंत्राटदाराला वेतन ही वेळेवर मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी त्या बसेस अनेक आगारात ठेवल्या आहेत. बेस्ट प्रशासन आणि कंत्राटदार कंपनी यांमध्ये झालेला जो करार आहे, तो त्यांनी पूर्ण केला नाही. अनेकवेळा त्यांच्याशी पत्रव्यवहारही करण्यात आला होता. ह्या कंत्राटदार कंपनीला कोणीतरी पाठीशी घालतंय असा आरोप बेस्ट कामगार सेनेतर्फे करण्यात आला आहे.

बेस्ट प्रशासनाची माहिती
बेस्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, या बसेसचा वापर केला जात नाही कारण संस्थेला त्यावर कायदेशीर अधिकार नाहीत. जरी त्या बेस्टच्या जागेवर ठेवण्यात आल्या आहेत, तरी या बसेस कोर्ट रिसीव्हरच्या आहेत. हा मुद्दा खटला सुरू असल्याने आणि लिलाव प्रक्रिया सुरू असल्याने, बेस्ट त्यांचा वापर करण्याच्या स्थितीत नाही," असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.


सम्बन्धित सामग्री