Monday, September 01, 2025 01:18:58 AM

Lalbaugcha Raja History: नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचा 91 वर्ष जुना इतिहास, जाणून घ्या..

नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागच्या राजाची ख्याती आहे. मुंबईतील परळमधील लालबाग परिसरात या गणपतीची स्थापना केली जाते. नवसाला पावणारा गणपती म्हणून भाविक मोठ्या संख्यने या ठिकाणी दर्शनाला येतात.

lalbaugcha raja history नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचा 91 वर्ष जुना इतिहास जाणून घ्या

Lalbaugcha Raja History: दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केली जातो. गणेशभक्त मोठ्या भक्तीभावाने श्रीगणेशाची पूजा करतात. गणेश उत्सवात भव्यता आणि श्रद्धेचा विचार केला तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मनात लालबागच्या राजाचे नाव येते. नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागच्या राजाची ख्याती आहे. मुंबईतील परळमधील लालबाग परिसरात या गणपतीची स्थापना केली जाते. नवसाला पावणारा गणपती म्हणून भाविक मोठ्या संख्यने या ठिकाणी दर्शनाला येतात. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविक लांबच्या लांब रांगेत उभे राहतात आणि दर्शन घेतात. या राजाला इच्छापूर्ती करणारा गणपती म्हणून ओळखले जाते. 

लालबागच्या राजाची स्थापना कधी झाली?
लालबागच्या राजाची स्थापना 1934 साली करण्यात आली. लालबागचा राजा सार्वजनिक गणेश मंडळाने लालबागच्या राजाची स्थापना केली. हे मंडळ मुंबईतील परळ परिसरातील लालबाग येथे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लालबागच्या राजाची स्थापना झाली. 


हेही वाचा: Gold Rate Today: गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर सोन्याच्या दरात मोठी वाढ; ग्राहकांना फटका तुमच्या शहरातील दर तपासा एका क्लिकवर

लालबागच्या राजा स्थापना कशी झाली? 
मुंबईतील परळमधील पेरुचाळ येथे उघड्यावर बाजार भरत होता. त्यामुळे मच्छिमारांनी नवस केला. त्यानंतर 1932 साली  मच्छिमारांचा नवस पूर्ण होऊन त्यांना बाजारासाठी कायमस्वरुपी त्यांची आधीची जागा मिळाली. यानंतर लालबागच्या राजाची स्थापना करण्यात आली. 1934 साली होडी वल्हवणाऱ्या दर्यासारंगाच्या रूपात 'श्री'ची स्थापना झाली. येथूनच नवसाला पावणारा लालबागचा राजा म्हणून श्रीची मूर्ती प्रसिद्ध झाली. कोळी समाजाच्या नवसाला पावलेला गणपती म्हणून हा गणपती सर्वप्रथम प्रसिद्ध झाला. 

लालबागच्या राजाला प्रसिद्धी कशी मिळाली? 
सुरुवातीला हे मंडळ स्थानिक मच्छिमारांनी सुरु केले होते. या ठिकाणी अनेक भाविकांच्या इच्छा पूर्ण होऊ लागल्या. त्यामुळे भाविकांची गर्दी वाढत गेली. कालांतराने, पर्यटकांची संख्या वाढली आणि प्रसिद्धी एवढी झाली की लोक परदेशातूनही दर्शनासाठी येऊ लागले. 2001 नंतर माध्यमांनी या गणपतीचे दर्शन आणि उत्सव मोठ्या प्रमाणात दाखवण्यास सुरुवात केली. तेव्हा लोकप्रियता आणखी वाढली. यानंतर मोठे नेते, उद्योगपती, बॉलिवूड अभिनेते, क्रिकेटपटू आणि सामाजिक कार्यकर्ते सुद्धा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येऊ लागले.

हेही वाचा: Lalbaugcha Raja First Look : रेखीव डोळे, देखणं रूप ! लालबागच्या राजाची पहिली झलक समोर
लालबागच्या राजाचा इतिहास
लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीकरता जनजागृती व्हावी म्हणून सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली. तोच उद्देश त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी नजरेसमोर ठेवून धार्मिक कार्याबरोबरच समाज जागृती करण्याचे महत्त्वाचे कार्य हाती घेतले. 1934 ते1947 या स्वातंत्र्यपूर्वकाळात विविध नेत्यांची व्याख्याने आयोजित केली जात होती. 


सम्बन्धित सामग्री