Ganesh Chaturthi Dance Viral Video : गणेश चतुर्थी हा आनंदाचा उत्सव आहे. हा उत्सव संपूर्ण भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. भारतीय संस्कृती इतकी भव्य आणि आकर्षक आहे, जगात सर्वांना याविषयी आदर आहे. विशेषत: आपले सण जगभरातील लोकांना आकर्षित करतात. येथील सण-उत्सवांची रेलचेल आणि ते साजरे करण्याची पद्धत जगभरातील लोकांना भुरळ घालते. त्यामुळे भारताव्यतिरिक्त इतर देशांमधील लोकांना आणि हिंदूंशिवाय इतर धर्मीय लोकांनाही यात सहभागी व्हायला आवडते.
म्हणूनच, जगभरातील उत्सवाची छायाचित्रे, व्हिडिओ प्रत्येक उत्सवात जगभरात पाहिली जातात आणि व्हायरल होतात. यावर्षी गणेश चतुर्थी 27 ऑगस्टला होती. या दिवसापासून 10 दिवसांच्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली. भारतात हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. यासह काही परदेशांमध्येही हा सण साजरा होत आहे.
हेही वाचा - Lalbaugcha Raja 2025 : दर्शनासाठी पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी; इतकी लांबलचक रांग, पाहा Video
सोशल मीडियावर गणेश चतुर्थीच्या उत्सवाच्या दरम्यान आफ्रिकन मुलांचा नृत्याचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, मुले 'घालीन लोटांगण वंदीन चरण' या मराठीतील प्रार्थनेच्या शब्दांवर उत्साहाने नाचताना दिसतात. यातील बहुतेक मुलांना बहुधा गाण्याचा अर्थही माहीत नसावा, असे वाटते. तरीही ते अशा पद्धतीने आणि इतक्या मनापासून नाचत आहेत, जसे काही ते बर्याच वर्षांपासून गणेशाची उपासना करत आले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओने लोकांची मने जिंकली आहेत. हा व्हिडिओ सर्वांना खूप आवडला आहे. कमेंटसमध्ये लोकांनी मुलांच्या नृत्याचे कौतुक केले आहे. दोन खूप वेगळ्या असलेल्या संस्कृतींच्या या सुंदर देवाणघेवाणीमुळे सर्वांचा आनंद द्विगुणित झाला.
येथे व्हायरल व्हिडिओ पहा -
यावर्षी गणेशोत्सव 27 ऑगस्टपासून पुढे 10 दिवस साजरा केला जात आहे. गणश देवाचा जन्म कसा झाला, याविषयी खूप सुंदर कथा सांगितली जाते. देवी पार्वतीने भगवान गणेशाची रचना तिच्या शरीरावरील मळापासून केली. जेणेकरून ती आंघोळ करताना तो त्या खोलीचे रक्षण करेल. पार्वती मातेने कोणालाही त्या खोलीत प्रवेश न देण्याचे कठोर आदेश गणेशाला दिले होते. त्यावेळी भगवान शिव घरी नव्हते. परंतु, जेव्हा ते परत आले, तेव्हा गणेशाने त्यांचा मार्ग अडवला आणि त्यांना आत जाऊ दिले नाही. यावर भगवान शिव रागावले आणि त्यांनी रागाने गणेशाचे डोके उडवले. पण जेव्हा देवी पर्वती परत आली तेव्हा ती रडू लागली आणि खूप उद्विग्न झाली. तिने भगवान महादेवांकडे गणेशाला पुन्हा जिवंत करण्याची मागणी करत हट्ट धरला. तेव्हा, भगवान महादेवांनी गणेशाच्या उडवलेल्या डोक्याच्या जागी हत्तीचे शिर बसवले आणि गणपतीचे पुनरुज्जीवन केले, अशी आख्यायिका गणेशजन्म आणि गणेश चतुर्थीविषयी सांगितली जाते. या शुभ दिवशी, लोक नवीन व्यवसाय सुरू करतात. नवीन कामांना सुरुवात करतात.
हेही वाचा - Kokichi Akuzawa: जगाला थक्क करणारी जिद्द! 102 वर्षीय कोकिची अकुझावा ठरले माउंट फुजी सर करणारे सर्वात वयस्कर पर्वतारोही