Monday, September 01, 2025 10:52:51 AM

Mumbai Rain Update: आज मुंबईत हवामान कसे असेल? जाणून घ्या नवीन अपडेट

मुंबईत सध्या हवामान बदलत्या स्वरूपाचे आहे. ढगाळ वातावरणासोबत काही भागात ऊन पडले आहे. मात्र हवामान विभागाने पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली आहे.

mumbai rain update आज मुंबईत हवामान कसे असेल जाणून घ्या नवीन अपडेट

Mumbai Rain Update: गेल्या दोन दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसाला सध्या थोडी उसंत मिळाली असली तरी, मुंबईत हवामान बदलत्या स्वरूपाचे आहे. ढगाळ वातावरणासोबत काही भागात ऊन पडले आहे. मात्र हवामान विभागाने पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली आहे. येत्या आठवड्यात शहर व उपनगरांमध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच हवामान विभागाने 26 आणि 27 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा इशारा देत यलो अलर्ट जारी केला आहे. 

मुंबई हवामान अंदाज - 

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, रविवार ते सोमवार शहरात मध्यम पाऊस आणि ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच आठवड्याच्या मध्यात पावसाची तीव्रता वाढणार असून, गुरुवार-शुक्रवारनंतर थोडी घट अपेक्षित आहे. मान्सून अजून संपलेला नसल्याने सप्टेंबरचा पहिला आठवडा तुलनेने कोरडा, तर दुसरा आठवडा व ऑक्टोबर महिन्यात नेहमीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.

तलावांची पातळी व पाणीसाठा - 

मुंबईला पाणीपुरवठा करणारे जलसाठे जवळपास पूर्ण क्षमतेने भरले आहेत. 24 ऑगस्ट रोजी साठवणूक क्षमता 97.8% इतकी नोंदवली गेली. काही तलावांमधून अंशतः पाणी सोडण्यात येत आहे. यावर्षीचा पाणीसाठा गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक असल्याने पाणीटंचाईची शक्यता कमी आहे.

हेही वाचा - Virat Kohli: निवृत्ती की नवा डाव? विराटच्या तयारीने BCCI बुचकळ्यात

मोडक सागर, वेहार, तुळशी : 100% भरले

तानसा : 98.69%

मध्य वैतरणा : 98.01%

अप्पर वैतरणा : 95.75%

भातसा : 94.38%

हेही वाचा - Weather Alert : रविवारी पुन्हा बसरणार! राज्यातल्या या 7 जिल्ह्यांना यलो अलर्ट

वाहतूक व नागरिकांना सूचना

सध्या लोकल ट्रेन सेवा सुरळीत सुरू आहेत. मात्र, मुसळधार पावसामुळे वेळापत्रकात व्यत्यय येऊ शकतो, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. नागरिकांना छत्री बाळगण्याचा, प्रवास नियोजन काळजीपूर्वक करण्याचा आणि हवामानासंबंधी ताज्या अद्यतनांकडे लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
 


सम्बन्धित सामग्री