vice president of india elections
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामुळे देशाच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. त्यानंतर आता उपराष्ट्रपतीपद रिक्त झालं आहे. यासाठी आता 9 सप्टेंबर उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे.मात्र या पदासाठी उमेदवार कोण असणार? याबद्दलच्या चर्चा सुरू होत्या. अखेर या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. कारण एनडीएकडून उपराष्ट्रपती पदासाठी महत्त्वाचं नाव निश्चित होण्याची शक्यता आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांना या निवडणुकीसाठी महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार आहे. इंडिया आघाडीकडून यावेळी कोणाचं नाव निश्चित होतं ते पाहणं महत्त्वाचं आहे. इंडिया आघाडीचा चेहरा सर्व पक्षांसोबत चांगले संबंध असणारा, सर्वसमावेशक असा आश्वासक चेहरा राहिला तर एनडीएसाठी ते आव्हान असू शकतं.परिणामी, ही निवडणूक अधिक रंजक होण्याची शक्यता आहे.
एनडीएकडून उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार निश्चित करण्यात येत आहे. भाजप यावेळी धक्कातंत्र वापरण्याचे संकेत मिळत आहे.