मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर गंभीर आरोप करत म्हटलं आहे की, वक्फ (दुरुस्ती) विधेयक मंजूर केल्यानंतर आता भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ख्रिस्ती, जैन, बौद्ध आणि हिंदू मंदिरांच्या जमिनींवर डोळा ठेवत आहेत.
मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ठाकरे म्हणाले, 'वक्फ कायद्याच्या अंमलबजावणीनंतर आता ख्रिस्ती, जैन, बौद्ध आणि हिंदू मंदिरांच्या जमिनींवर लक्ष केंद्रित केलं जात आहे. हे सर्व मोक्याच्या जमिनी त्यांच्या मित्रांना देण्यासाठीचं षड्यंत्र आहे.'
'पक्षाचा स्थापना दिवस रामनवमी असेल तर रामासारखं वागा' उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला
‘ऑर्गनायझर’च्या लेखाचा संदर्भ:
ठाकरे यांनी आरएसएसशी संलग्न असलेल्या ‘ऑर्गनायझर’ साप्ताहिकात प्रकाशित झालेल्या एका लेखाचा उल्लेख केला. या लेखात असा दावा करण्यात आला होता की, 'कॅथलिक चर्चकडे देशातील सर्वाधिक बिगर सरकारी जमिनी आहेत, ज्यांची एकूण मालकी 7 कोटी हेक्टर इतकी आहे.' या लेखानंतर विरोधकांनी संघ परिवारावर टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या विषयावर संघावर निशाणा साधला आहे.