मुंबई: राज्याच्या राजकारणात अनेक नवनवीन घडामोडी घडत आहेत. एकीकडे, काही नेते दौऱ्यावर आहेत तर दुसरीकडे, अनेक नेते एकमेकांवर टीकेचा वर्षाव करत आहेत. अशातच, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी ट्वीट करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. दानवे म्हणाले की, 'कबुतरांचे दाणा-पाणी पाहून झाले असेल तर सरकारने आता याकडे बघावे. बाकी सविस्तर बोलूच परत'. दानवेंनी ट्वीट करत सत्ताधाऱ्यांवर टीका केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
'...तर सरकारने आता याकडे बघावे' - अंबादास दानवे
अंबादास दानवे म्हणाले की, 'महायुतीच्या मंत्र्याच्या कारभाराच्या एक एक सुरस कथा बाहेर आल्या. आज अजून एक कथा सांगतो! बदल्यांमध्ये कसे 'कौशल्य' वापरले जाते पहा. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या खात्यातील 41 जणांची पदोन्नती झाली. आणि आश्चर्य म्हणजे या सर्वांना तिथेच परत पोस्टिंग मिळाली जिथे ते पदोन्नतीपूर्वी कार्यरत होते. या 41 जणांच्या यादीत 23 व्या क्रमांकावर असलेले दिपक भोळसे या कर्मचाऱ्याला त्याच्या दिव्यांगत्वाबाबत नोटीस देण्यात आली आहे. असे असताना प्रमोशन.. आहे तिचेच त्यांची पुन्हा नेमणूक.. हे भारिये..!'.
'कबुतरांचे दाणा-पाणी पाहून झाले असेल तर सरकारने आता याकडे बघावे. बाकी सविस्तर बोलूच परत.. तूर्तास भोळसे यांना दिलेली नोटीस पहा', अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिली.

'राहु द्या, हे तुमच्याने होणार नाही' - अंबादास दानवे
अंबादास दानवे म्हणाले की, 'कर्जमाफीसाठी आता समिती असे महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले.. @cbawankule जी, आपल्याच पक्षाचे नेते @nitin_gadkari जी एक गोष्ट कायम सांगतात.. ''इच्छा तिथे मार्ग.. जिथे इच्छा नाही तिथे येते सर्वेक्षण, अभ्यास, समित्या, उपसमित्या आणि अहवाल..''. आज समितीचा खडा मारून पाहिलात आपण, यातच आपली आणि आपल्या सरकारची राज्य राजकीय इच्छाशक्ती दिसली.. राहु द्या, हे तुमच्याने होणार नाही! #farmer #loanwaiver #MaharashtraNews @BJP4Maharashtra'.