Sunday, August 31, 2025 08:46:18 PM

Amit Shah Mumbai Tour: अमित शाह सहकुटुंब लालबागच्या दर्शनाला; गोंडस नातवाला कडेवर घेऊन दर्शन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आहेत. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही त्यांनी नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. अमित शाह सहकुटुंब लालबाग चरणी लीन झाले.

amit shah mumbai tour अमित शाह सहकुटुंब लालबागच्या दर्शनाला गोंडस नातवाला कडेवर घेऊन दर्शन

Amit Shah Mumbai Tour: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आहेत. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही त्यांनी नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. अमित शाह सहकुटुंब लालबाग चरणी लीन झाले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी, मुलगा जय शाह यांच्यासह अमित शाहांचा नातू देखील दर्शनाला आल्याचे पाहायला मिळाले आहे. 

हेही वाचा: Maratha Reservation Meeting: मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरू, काय तोडगा निघणार?

दरम्यान लालबागच्या राजाचे दर्शन घेण्याआधी केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सपत्नीक गणपतीची आरती केली. देवेंद्र फडणवीस यांनी भेट म्हणून दगडूशेठ गणपतीची मूर्ती शाहांना दिली. यावेळी एकनाथ शिंदे देखील वर्षा बंगल्यावर उपस्थित होते. 
 


सम्बन्धित सामग्री