Monday, September 01, 2025 04:31:54 PM

Chandrashekhar Bawankule : '2047 पर्यंत काँग्रेस हद्दपार होणार', राहुल गांधींना म्हणाले, 'माझ्याविरोधात..'

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं. आम आदमी पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला. तर, काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. या पार्श्वभूमीवर भाजपकडून काँग्रेसवर मोठी टीका होत आहे.

chandrashekhar bawankule  2047 पर्यंत काँग्रेस हद्दपार होणार राहुल गांधींना म्हणाले माझ्याविरोधात

Chandrashekhar Bawankule: नुकतेच दिल्लीच्या निवडणुकांचे निकाल लागले आहेत. यावेळी दिल्लीकरांनी भाजपला निवडून दिले आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव आहे. यावेळी भाजपच्याविरूद्ध लढतच राहणार, असं आतिशी यांनी म्हटलं आहे. या निवडणुकीत भाजपला 48 आणि आम आदमी पक्षाला 22 जागा मिळवण्यात यश आलं आहे. मात्र, काँग्रेस पक्षाला एकही जागा मिळालेली नाही. दिल्लीत आता लवकरच भाजपचं सरकार स्थापन होणार आहे. 

दिल्लीचं तख्त कोणाकडे येणार याकडे अख्ख्या देशाचं लक्ष होतं. त्यामुळे याची बरीच चर्चा होती. खरं तर इंडिया आघाडीत एकत्र असूनही काँग्रेस आणि आम आदमी पक्ष दिल्लीची निवडणूक स्वतंत्रपणे लढले. याचाच फटका दोन्ही पक्षाला बसल्याचा दावा आता इंडिया आघाडीतील नेत्यांकडून केला जात आहे. आता चंद्रशेखर बावनकुळेंनीही यावर प्रतिक्रिया दिली असून त्यांनी राहुल गांधींना ओपन चॅलेंज दिले आहे.

हेही वाचा - Delhi Election Result 2025 : '…तर भाजपच्या 20 जागाही आल्या नसत्या', रोहित पवारांनी इंडिया आघाडीतील पक्षांचे टोचले कान

काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा दिल्लीत मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून आता प्रतिक्रिया येत आहेत. तसेच दिल्लीत काँग्रेसला एकही जागा न मिळाल्यामुळे काँग्रेसवर सत्ताधारी पक्षाकडून टीका करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही काँग्रेसवर जोरदार टीका केली. “2047 पर्यंत काँग्रेस हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही”, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
'काँग्रेस पक्षाकडे कोणतंही मॉडेल नाही. कोणतीही नीती नाही. काँग्रेसकडे कोणतीही नीतीमत्ता नाही. जनता काँग्रेसला मते का देतील? त्यांच्याकडे कोणतीही योजना नाही. 2047 पर्यंत काँग्रेस हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही. 2047 पर्यंत या देशात काँग्रेस निवडणूक जिंकू शकत नाही. कारण 2047 पर्यंत विकासाचा मार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या संकल्पावर राष्ट्र पुढे चालणार आहे. जनता देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या संकल्पांना साथ देईल', असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं आहे. याशिवाय, बावनकुळे यांनी राहुल गांधींना खुलं आव्हान दिलं आहे. 'हिंमत असेल तर, राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, चितपट केल्याशिवाय राहणार नाही,' असं बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा - मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून 5 लाख महिलांना वगळले; नव्या निकषांनुसार आधीच्या लाभार्थी ठरल्या अपात्र
अडीच दशकांनंतर दिल्लीत भाजपाचं पुनरागमन
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 48 जगांवर विजय मिळवत तब्बल अडीच दशकांनंतर दिल्लीच्या सत्तेत पुनरागमन केलं आहे. ही दमदार कामगिरी करताना भाजपाने आम आदमी पक्षाचा धुव्वा उडवला आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा देखील पराभव झाला आहे. त्यामुळे आम आदमी पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.


सम्बन्धित सामग्री