Wednesday, August 20, 2025 11:31:20 AM

अतिरेकी मेल्याचं तुम्हाला दुःख झालंय का?; अमित शाह यांचा विरोधकांना सवाल

21 जुलैपासून संसदेत पावसाळी अधिवेशनाची सुरूवात झाली. या दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, 'जेव्हा काल या अतिरेक्यांना मारण्यात आले, तेव्हा त्यांची तीन रायफल जप्त करण्यात आली'.

अतिरेकी मेल्याचं तुम्हाला दुःख झालंय का अमित शाह यांचा विरोधकांना सवाल

नवी दिल्ली: 21 जुलैपासून संसदेत पावसाळी अधिवेशनाची सुरूवात झाली. या दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, 'जेव्हा काल या अतिरेक्यांना मारण्यात आले, तेव्हा त्यांची तीन रायफल जप्त करण्यात आली. एक 'एम-9' अमेरिकन रायफल होती, तर दुसरी एके-47 रायफल होती. जे काडतूस भेटले होते, ते आणि एम-9 आणि एके-47 हे पण होते. मात्र, आपण संतुष्ट नाही मानलो, या रायफल्सना एका विशिष्ट विमानाने काल रात्री चंढीगडला पाठवण्यात आले'.  

पुढे अमित शहा म्हणाले की, 'आज संसदेत हे सांगण्यास मला खूप आनंद होत आहे की मोदीजींनी ऑपरेशन सिंदूर करून ज्यांनी दहशतवाद्यांचा इथे बोलावले होते, आम्ही त्या दहशतवाद्यांचा आणि त्यांच्या ठिकाणांचा खात्मा केला'. यावर, विरोधकांनी आक्षेप घेतला. यावर, अमित शहांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले की, 'मी सांगतो यांचे आका कसे मारले गेले. तेही मी नाव घेऊन आणि जागेसह सांगतो'. 


 


सम्बन्धित सामग्री