Monday, September 01, 2025 04:23:57 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर

शुक्रवारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, ते वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर: शुक्रवारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, ते वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. सकाळी 10:20 वाजता मुख्यमंत्री फडणवीस कोल्हापूर विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर, ते इचलकरंजी येथे जातील. सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून विविध कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होईल. तसेच, 11:20 वाजता ते वरिष्ठ सनदी अधिकारी विकास खारगे यांच्या निवासस्थानी भेट देतील. त्यानंतर, सकाळी 11:45 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात मुख्यमंत्री फडणवीसांची विकासपर्व जाहीर सभा होईल. दुपारी 12:50 वाजता ते आर्यचाणक्य नागरी सहकारी संस्थेला भेट देणार आहेत. त्यानंतर, दुपारी 1:05 वाजता मुख्यमंत्री फडणवीस सांगलीला रवाना होतील.

हेही वाचा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी सांगली दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री अजित पवारही कोल्हापूर दौऱ्यावर:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार देखील कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. मात्र, ते वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होतील. सकाळी 9:45 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर विमानतळावर पोहोचतील. तिथून ते मुरगूड (ता. कागल) येथे जाणार आहेत. सकाळी 11 वाजता अजित पवार विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवात उपस्थित राहतील. तसेच, दुपारी 12:30 वाजता दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्रीच्या इथेनॉल उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होईल. दुपारी 3 वाजता मुदाळ (ता. भुदरगड) येथे कार्यकर्ता मेळाव्यासाठी ते उपस्थित राहणार आहेत. यानंतर, सायंकाळी 5:20 वाजता नागाव (ता. हातकणंगले) येथे सिटीझन सिंडीकेट संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होईल. सायंकाळी 6 वाजता ते विमानाने पुण्याला जाणार आहेत.


सम्बन्धित सामग्री