नागपूर : एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली. 80 प्रवाशांपैकी 77 प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. बोट दुर्घटनेत एक जण बुडाला. नौदलाकडून बचावकार्य कार्य सुरू आहे. या दुर्घटनेसंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बचावकार्यासाठी सर्व त्या यंत्रणा तैनात करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांची पोस्ट
एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या बोटीचा अपघात घडल्याचे वृत्त प्राप्त झाले. नौदल, कोस्टगार्ड, पोर्ट, पोलिस पथकच्या बोटी तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. जिल्हा आणि पोलिस प्रशासनाशी सातत्याने आम्ही संपर्कात असून, सुदैवाने बहुसंख्य नागरिकांना वाचविण्यात आले आहे. तथापि अजूनही बचावकार्य सुरू आहे. बचावकार्यासाठी सर्व त्या यंत्रणा तैनात करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.
हेही वाचा ... https://www.jaimaharashtranews.com/mumbai/the-boat-to-elephanta-capsized-rescue-operation-started/32032
एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली. 80 प्रवाशांपैकी 77 प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. तर तिघे दगावल्याची माहिती आहे. या बोटीची 130 प्रवाशी क्षमता होती. नौदलाच्या स्पीड बोटाने धडक दिल्याने ही दुर्घटना घडली.