Wednesday, August 20, 2025 01:09:46 PM

'केवळ यात्रा काढून चालणार नाही, ओबीसींच्या...'; फडणवीसांची राज राजापूरकरांवर टीका

नुकताच, मुख्यमंत्री फडणवीसांनी मंडल यात्रेवर टीका केली. ते म्हणाले की, 'केवळ यात्रा काढून चालणार नाही, ओबीसींच्या पाठीशी उभे रहा'. या वक्तव्याने राजकीय वातावरण तापलं आहे.

केवळ यात्रा काढून चालणार नाही ओबीसींच्या फडणवीसांची राज राजापूरकरांवर टीका

मुंबई: नुकताच, मुख्यमंत्री फडणवीसांनी मंडल यात्रेवर टीका केली. ते म्हणाले की, 'केवळ यात्रा काढून चालणार नाही, ओबीसींच्या पाठीशी उभे रहा'. यावर, शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस राज राजापूरकरांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, 'तुमच्याच पक्षाने ओबीसी आरक्षण नाकारलं'. या वक्तव्याने राजकीय वातावरण तापलं आहे. 

काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

'अनेक प्रकारच्या योजना ओबीसी समाजापर्यंत पोहोचू दिल्या नाही. ओबीसी समाजाला केवळ भाषणाचं राजकारण त्यांनी दिलं. म्हणून, आज ज्यावेळी ओबीसी समाज हा दुरावला आहे, असं लक्षात आलं तर, आता ते यात्रा काढत आहे. मात्र, केवळ यात्रा काढून काही फायदा होणार नाही. ओबीसीच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभे राहा. हे कधीतरी दिसूद्या', अशी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली.

 


सम्बन्धित सामग्री