Monday, September 01, 2025 11:46:09 AM

आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये हल्लाबोल महामोर्चा

शिवसेना ठाकरे गटाने आवाज उठवला असून महापालिकेच्या या निष्काळजी कारभाराचा उघडकीस करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने 16 मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथील महापालिकेवर हल्लाबोल महामोर्चा काढण्यात येणार आहे.

आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये हल्लाबोल महामोर्चा

छ. संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या गैरव्यवस्थापनामुळे संपूर्ण शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. दर पाच दिवसांनी पाणी देण्याचे आश्वासन देऊनही महानगरपालिका बारा ते पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा करत आहे. त्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने आवाज उठवला असून महापालिकेच्या या निष्काळजी कारभाराचा उघडकीस करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने 16 मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथील महापालिकेवर हल्लाबोल महामोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच, या मोर्चाचे नेतृत्व युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते करणार आहेत.

हेही वाचा: मी मध्यस्थी केली असं म्हणणार नाही; मध्यस्थीच्या वक्तव्यावरून ट्रम्प यांचा यु-टर्न

राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाने छत्रपती संभाजीनगर शहरात अभूतपूर्व पाणी टंचाई निर्माण केली आहे. या ढिसाळ कारभारामध्ये सुधारणा व्हावी यासाठी, 'लबाडांनो, पाणी द्या', असे आंदोलन शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन महिनाभर करण्यात येणार आहे.


सम्बन्धित सामग्री