Wednesday, August 20, 2025 01:08:43 PM

मिरा भाईंदरमधील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना घरातून उचलण्याला माझा विरोध; मंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया

मिरा- भाईंदरमधील वातावरण तापलं आहे. यावर कार्यकर्त्यांना घरातून उचलणे याला माझा विरोध असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.

मिरा भाईंदरमधील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना घरातून उचलण्याला माझा विरोध मंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया

मुंबई: मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन आज मिरा- भाईंदरमध्ये मनसे आणि ठाकरे गटाचा मोर्चा निघणार आहे. मात्र या मोर्चाआधीच पोलिसांनी मनसैनिकांना नोटीसा बजावल्या आहेत. तर काही मनसे नेत्यांना घरातून ताब्यात घेतले आहे. यावरुन आता मिरा- भाईंदरमधील वातावरण तापलं आहे. यावर कार्यकर्त्यांना घरातून उचलणे याला माझा विरोध असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. 

मनसेच्या मोर्चाआधी मिरा- भाईंदरमधील वातावरण चिघळलं आहे. पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली जात आहे. मनसे नेत्यांना रात्रीच पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. तसेच काही नेत्यांनी घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. यावर मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कार्यकर्त्यांना घरातून उचलण्याला माझा विरोध आहे. मी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोबत चर्चा करणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा: मनसेच्या मोर्चाआधी मिरा-भाईंदरमधील वातावरण तापलं; पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड

गेली चार टर्म मी आमदार आहे. शांतताप्रिय शहर म्हणून ओळखले जाते. आताच मी पोलीस आयुक्तांशी बोलून नाराजी वर्तवली आहे. पोलिसांनी अशा प्रकारे कारवाई करायला नको आहे. गुजराती व्यावसायिकांचा मोर्चा झाला तर मग मराठी एकीकरण समितीला परवानगी  का दिली नाही असा सवाल मंत्री सरनाईक यांनी पोलिसांना केला आहे. पोलिसांनी मिरा- भाईंदरमधील मोर्चाआधीच मनसे नेत्यांना घरातून ताब्यात घेतले आहे. यावर कार्यकर्त्यांना घरातून उचलण्याला माझा विरोध आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार आहे. मिरा- भाईंदरमध्ये पोलीस धरपकड करत आहेत. जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र आधी मोर्चा होऊन द्यायला पाहिजे होता असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.  

पोलिसांकडून सर्व मनसे नेत्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. पोलिसांनी मनसैनिकांना मीरा-भाईंदरमध्ये न येण्यासाठी नोटीस बजावलं आहे. तर राज ठाकरेंच्या पुढील आदेशावर मनसैनिक दिशा ठरवणार आहेत. सध्या मनसेच्या मोर्चाआधी मिरा-भाईंदरमधील वातावरण तापलं असून पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरु आहे. मीरा रोड परिसरात पोलिसांकडून जमावबंदी करण्यात आली आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदरमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


सम्बन्धित सामग्री