नाशिक : राज्यात महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 15 डिसेंबर रोजी झाला. या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांना स्थान मिळाले नाही. यामुळे भुजबळांचे कार्यकर्ते निराश झाले आहेत. त्यामुळेच आज नाशिकमध्ये भुजबळांच्या समर्थनार्थ ओबीसींचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात त्यांनी महायुतीवर टीका केली. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेमुळे आमदार निवडून आले, असा काहींचा भ्रम झाला अशी अप्रत्यक्ष टीका भुजबळांनी केली आहे. त्याचवेळी त्यांनी अजित पवारांवरही निशाणा साधला आहे.
विधानसभा निवडणूक झाली. यापुढेही अनेक निवडणूका आहेत. निवडणुका अजून संपलेल्या नाहीत. महापालिका, जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. फक्त लाडकी बहीण योजनेमुळे आमदार निवडून आले नाहीत. काही लोकांना आमदार लाडकी बहीण योजनुमळे निवडून आले असा भ्रमा झाला आहे. परंतु इतर गोष्टीही महत्त्वाच्या होत्या. मला पाडण्यासाठी प्रयत्न झाल्याचेही भुजबळ यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... https://www.jaimaharashtranews.com/politics/jaranges-got-reward-for-taking-on-the-body/32010
प्रश्न मंत्रीपदाचा नाही तर अस्तित्वाचा असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. आम्ही रस्त्यावर ही लढाई घेऊन जाऊ. मी संपूर्ण राज्यात जाणार अशी घोषणाही त्यांनी केली आहे. बंधनं असली तरीही रास्ता मेरा है असेही भुजबळ म्हणाले आहेत. या मेळाव्यात भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतली.