मुंबई : हास्य कलाकार कुणाल कामरा सध्या वादात सापडला आहे. कुणाल कामरा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त शब्द वापरला आहे. कामराच्या वक्तव्याने शिवसैनिक संतापल्याचे पाहायला मिळाले. शिवसैनिकांनी कामराने माफी मागावी अशी मागणी केली होती. यावर एक्स पोस्ट करत माफी मागण्यास नकार दिला आणि आणि मी जे काही बोललो तेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल म्हटले असल्याचे सांगितले.
कुणाल कामरा याने केलेल्या वक्तव्यामुळे शिवसैनिक संतापले आणि त्यांनी कामराच्या शोचे चित्रीकरण झालेल्या स्टुडिओची तोडफोड केली. तसेच यावर राजकीय नेतेमंडळींनीही आरोप- प्रत्यारोप करण्यास सुरूवात केली आहे. या गाण्यात बेकायदेशीर काय ? असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या जयश्री शेळकेंनी केला आहे. त्यांनीही कुणाल कामराचं गाणं गायलं आहे.
हेही वाचा : आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी कितीची डील झाली?, दिशा सालियन प्रकरणावर वकील ओझांनी केला सवाल
कुणाला कामरा जेव्हा नवीन आला. तेव्हा त्याने काँग्रेसच्या नेत्यांसोबत देखील असे शो केले आहेत. मी त्यांच्या स्टुडिओत गेलो आहे. माझ्यावर देखील असे अनेक जण टिपण्णी करतात. कामरावर तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकला असता मग स्टुडिओ का तोडली. यालाच औरंगजेबची वृत्ती म्हणलं जातं. तोडायचे असेल तर मंत्र्यांचे बंगले तोडा, मलबार हिल परिसरात असलेले मंत्र्यांचे अनेक बंगले अनधिकृत आहेत. रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणलं तर काय चुकीचे आहे असा घणाघात खासदार राऊतांनी केला आहे. आपल्या बाजूने असेल तर बाजूने उभे राहायचे नाहीतर निष्ठा आणि तत्व सांगायची. कुणाल यांना विदेशी देशांनी स्टुडिओ उभे करण्यासाठी पैसे दिले आहेत. शिवसैनिकांना कामरा पळालेला नाही. त्याने स्पष्टपणे माफी मागणार नाही असे सांगितले आहे अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांनी दिली आहे.
हास्य कलाकार कामरा काय म्हणाला?
कुणाल कामराने त्याच्या शोमध्ये 'दिल तो पागल है' चित्रपटातील एक विडंबनात्मक गाणे गायले. या गाण्यात 2022 मध्ये शिवसेनेत झालेल्या फूटीचा उल्लेख करण्यात आला आहे. कामराने गाण्यात 'देशद्रोही' हा शब्द वापरला आहे. जो एकनाथ शिंदेंच्या गैरवापर म्हणून पाहिला जात आहे. यामुळे शिवसैनिक प्रचंड संतापले आहेत.