पिंपरी चिंचवड: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार सतत चर्चेत असतात. मात्र, आता अजित पवार एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. भाषण देण्यासाठी जेव्हा अजित पवार स्टेजवर आले, तेव्हा अचानक शॉर्ट सर्किट झाला. ही खटना अजित पवार यांच्यासमोर घडली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हेही वाचा: Manoj Jarange: 29 ऑगस्टला जरांगेंची तोफ मुंबईत धडाडणार, मुंबईला जाण्याचा मार्ग ठरला
अजित पवार काय म्हणाले?
'शहर गलिच्छ करू नका .ज्याचे बॅनर जास्त आहेत किंवा ज्याने पोस्टर लावले आहेत, त्यांना मतदान करू नका. जे लोक काम करतात, त्यांना जाहिरात करण्याची गरजच काय? मात्र, काम न करता जे लोक स्वत:चे बोर्ड लावतात ते मुद्दाम लोकांच्या मनात उतरायचा प्रयत्न करतात', अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी दिली. यासह, बारामतीप्रमाणे पिंपरी-चिंचवडमध्येही अनधिकृत फलकांवर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, असंही अजित पवारांनी सुचवलं.
नेमकं प्रकरण काय?
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने आयोजित केलेल्या स्वच्छ सन्मान सोहळा 2025 आणि स्वच्छ सर्वेक्षणच्या 2025 – 2026 पूर्वतयारीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात भाषण करण्यासाठी जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार व्यासपीठावर आले, तेव्हा व्यासपीठावर अचानक शॉर्ट सर्किट झाला. ही खटना अजित पवार यांच्यासमोर घडली. या घटनेनंतर, त्यांच्या सुरक्षारक्षकांनी लगेच पुढे धाव घेतली. मात्र, या घटनेनंतर कार्यक्रमाच्या आयोजकांनी तात्काळ वीज पुरवठा खंडीत केला.