हनी ट्रॅपवरुन विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हनी ट्रॅपचे आरोप फेटाळले आहेत. कुठल्याही मंत्र्यांची या हनीट्रॅपबाबत तक्रारही नाही, पुरावेही नाहीत अशी घटनाही समोर आलेली नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. सत्तापालट सिडीमुळे झालं असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
हनी ट्रॅपमध्ये म्हणतात की हनी नाही, ट्रॅप नाही. मात्र त्याबाबत अधिक माहिती ही सरकारकडे आहे. सत्तापालट झाला तो अशाच सीडीमुळे झाला आहे. त्यावर अधिक बोलण्याची गरज नाही. आम्हाला जेव्हा दाखवावा लागेल तेव्हा तिकीट लावून दाखवावे लागेल आणि विशिष्ट निमंत्रितांना बोलावावं लागेल. एवढा भक्कम पुरावा असल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हटले आहे. दरम्यान शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. कुठे हनी पण नाही, कुठे ट्रॅप पण नाही असं मुख्यमंत्र्यांनी संगितले आहे. मुख्यमंत्री यांच्याकडे गृह खातं आहे. त्यामुळे त्यांनी चौकशी करूनच विधान केले असेल. काही मुद्द्यावर नाशिकचे नाव खराब होत आहे हे दुर्दैवी आहे असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.