Wednesday, August 20, 2025 10:51:36 PM

'तुमचा बाप नगरविकास मंत्री आहे, हे लक्षात ठेवा'; राजेश क्षीरसागर संतप्त

शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चांडाळे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले पोस्टर महापालिका अधिकाऱ्यांनी फाडून टाकल्यानंतर शनिवारी मोठा वाद निर्माण झाला.

तुमचा बाप नगरविकास मंत्री आहे हे लक्षात ठेवा राजेश क्षीरसागर संतप्त

दिपक चव्हाण. प्रतिनिधी. सांगली: शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चांडाळे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले पोस्टर महापालिका अधिकाऱ्यांनी फाडून टाकल्यानंतर शनिवारी मोठा वाद निर्माण झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला आणि थेट कारवाईचा इशारा दिला.

हेही वाचा: Latur: लातूरमधील 12 गावांमध्ये लम्पीचा शिरकाव; 2 जनावरांचा मृत्यू

महेंद्र चांडाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजप-शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या दरम्यान, पोस्टर फाडल्याचा विषय ऐरणीवर आला. 'तुम्ही नगरपालिकेत काम करता, पण लक्षात ठेवा, तुमचा बाप नगरविकास मंत्री आहे. पोस्टर फाडणाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही', असा कडक इशारा क्षीरसागर यांनी या सभेत दिला. या घटनेमुळे, सांगलीतील राजकीय वातावरण शिगेला पोहोचले असून, पुढील काही दिवसात या मुद्द्याचा राजकीय रंग किती गडद होतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


सम्बन्धित सामग्री