मुंबई: मनोज जरांगे सकाळी मुंबईत आंदोलनासाठी आले आहेत. यावर जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केलं जातंय असा टोला संजय राऊत यांनी महायुतीला लगावला आहे.
मुंबई ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची राजधानी आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला मराठी माणूस आपला न्याय मागण्यासाठी मुंबईत आलेला आहे. मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे न्यायालयाचे काम नाही हे सरकारचं काम आहे. राज्याच्या गृह खात्याचे काम आणि खास करून राज्याच्या मुख्यमंत्र्याचे काम आहे. अप्रत्यक्षपणे कोणीतरी जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत आहे असे राऊत यांनी म्हटले आहे.
हेही वाचा: Manoj Jarange Patil: सर्व मागण्या मान्य होईपर्यंत मुंबई सोडणार नाही; आझाद मैदानावरुन जरांगेंचा सरकारला इशारा
संजय राऊत म्हणाले, आतापर्यंत आपण जेव्हा सत्तेवर आलेला आहात. तेव्हा आपण या प्रश्नांना चालना दिली. त्या माध्यमातून राजकारण तुम्ही केलं, मिस्टर फडणवीस आता त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण कोण करत असेल, आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात. जनतेला विश्वासात घेऊन सांगा राजकारण करणारे तुमच्या सरकारमध्ये आहेत, विरोधी पक्षात आहेत की कॅबिनेटमध्ये आहेत असे राऊतांनी मुख्यमंत्र्यांना म्हटले आहे.