धाराशिव: शिवसेना आणि ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये जवळीक वाढल्याची चिन्हे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय होण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. प्रताप सरनाईक यांनी आमदार प्रविण स्वामींची भेट घेतली आहे. यावेळी प्रविण स्वामी यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत सरनाईकांचे स्वागत केले. या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
शिवसेना मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह माजी खासदार रवींद्र गायकवाड आणि उमरगा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राहिलेले ज्ञानराज चौगुले आदी भेटीवेळी उपस्थित होते.
हेही वाचा: हल्ली कुणीही रमी खेळतं; माणिकराव कोकाटेंच्या व्हिडिओवर मंत्री सरनाईकांची पाठराखण
धाराशिवमध्ये ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. परिवहन मंंत्री प्रताप सरनाईक यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार प्रविण स्वामी यांची भेट घेतली. यामुळे ऑपरेशन टायगर होणार असल्याच्या चर्चांणा उधाण आले आहे. प्रताप सरनाईक आणि प्रविण स्वामी यांच्यात झालेली भेट अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र यामुळे चर्चांणा उधाण आले आहे. ठाकरे गटाचे आमदार प्रविण स्वामी शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
ठाकरे गटाचे आमदार प्रविण स्वामी आणि मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट झाली. सरनाईक यांनी प्रविण स्वामी यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी आमदार स्वामी यांनी मोठ्या जल्लोषात मंत्री सरनाईक यांचे स्वागत केले. या भेटीचं कारण कोणालाही समजलेलं नाही. परंतु या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे प्रविण स्वामी शिवसेनेत जाणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.