मुंबई: रविवारी सोलापूरमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला झाला. यादरम्यान, प्रवीण गायकवाड यांना शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. तसेच, त्यांना गाडीतून खेचून बाहेर काढले होते. यावर जेव्हा सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया दिली की, 'मला असं वाटतं, तुमची जी विधान भवनमध्ये टीम आहे, त्यांना माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायला सांगा. कारण गृहखातं त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे रिपोर्ट असेल तो कुठल्या पक्षाचा आहे. भाजपचे 10 कोटी सदस्य आहेत. डेटा बेसवरुन कळेल तो कार्यकर्ता आहे की नाही'.
प्रदेशाध्यक्षपदावर सुप्रिया सुळे म्हणाल्या...
यासोबतच पत्रकारांनी खासदार सुप्रिया सुळे यांना विचारले की, 'जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला का?'. यावर सुप्रिया सुळेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली की, 'मी त्यांचा राजीनामा पाहिलेला नाही. मी तो वाचलेला नाही. तुमच्या चॅनलला बातमी देणारा जो सूत्र आहे, त्या सूत्राने दिलेली बातमी विचार करुन लावा. हा सूत्र खात्रीलायक नाही. शिवाय तुमच्या विश्वाहर्तेचा प्रश्न आहे'.
पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'मी अशा कोणत्याही राजीनाम्याबद्दल ऐकले नाही. मी ते वाचलेले नाही. उद्या पक्षाची बैठक आहे, त्यात आपल्याला कळेल. मी जयंत पाटलांशी रोज बोलते. जी घटना आमच्या आयुष्यात झाली नाही, त्या बद्दल काय बोलणार?'.
हेही वाचा: SAINA NEHWAL DIVORCE: तब्बल 7 वर्षानंतर घटस्फोट; नेमकं कारण काय? जाणून घ्या
प्रदेशाध्यक्ष बदलणार?
'राजकीय पक्ष, संघटनेत जी जबाबदारी पडेल, तिथे प्रत्येक कार्यकर्ता काम करायला तयार आहे. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे यांनी संघर्ष केला आहे. कितीही आव्हान आली तरी कालही, आजही आणि उद्याही संघर्ष करायला तयार असतात', असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं. यासोबतच, पत्रकारांनी सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारलं की, 'राजीनाम्याची चर्चा विरोधकांनी घडवून आणली का?'. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'ज्या गोष्टीत वास्तव नाही, त्यात एवढा वेळ का घालवायचा?. प्रविणदादा, महागाई एवढे विषय आहेत'.