Sunday, August 31, 2025 02:04:17 PM

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या निमंत्रण पत्रिकेत शिंदेंचं नाव ?

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या निमंत्रण पत्रिकेत शिंदेंचं नाव

मुंबई : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज संपन्न होणार आहे. मुंबईतील फोर्ट येथील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधीला अवघे काही तास उरले असताना आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या निमंत्रण पत्रिकेची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या शपथविधीच्या निमंत्रण पत्रिकेत एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. तर शिवसेना पक्षाच्या निमंत्रण पत्रिकेतही शिंदेंचे नाव टाकले नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे शपथविधी सोहळ्याला हजर राहणार का ? अशी चर्चा सर्वत्र होत आहे.    

निमंत्रण पत्रिकेत शिंदेंचं नाव ?

नव्या सरकारचा शपथविधी आज 5.30 वाजता संपन्न होणार आहे. या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. मात्र एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील का ? असा प्रश्न संपूर्ण राज्याला पडणार आहे. कारण शिंदेंनी अद्यापही त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही. त्यातच उदय सामंत यांनी शिंदे एका तासात भूमिका मांडणार असल्याचे सांगितले आहे. शपथविधीला अवघे काही तास उरले असताना अजूनही शिंदेनी भूमिका मांडली नसल्याने राजकीय चर्चांणा उधाण आले आहे. महायुती सरकारच्या शपथविधीच्या निमंत्रण पत्रिकेची सर्वत्र चर्चा आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या निमंत्रण पत्रिकेत एकनाथ शिंदे यांच नाव नाही. पत्रिकेत शिंदेंचं नाव नसणे एक वेगळाच संकेत आहे. एकनाथ शिंदे नाराज असल्याचे चित्र दिसत आहे.

सुरूवातीला एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असल्याचे चित्र होते. मात्र दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर यावर पडदा पडला. एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले. त्यानंतर शिंदे गृहखाते मिळावे यासाठी आग्रही असल्याचे दिसून आले. पण भाजपा गृहखात्यावर ठाम असल्याचे दिसत होते. शिंदे नगरविकास खात्यावरदेखील आग्रही असल्याचे दिसून आले. मात्र शिंदेंचे नगरविकास खाते देखील संभ्रमात असल्याच्या चर्चा आहेत.  

 

 


सम्बन्धित सामग्री