शुभम उमाळे. प्रतिनिधी. मुंबई: शिवसेना सांगली जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने बुधवारी सांगलीतून भारतीय सैनिकांसाठी महारक्तदान यात्रेची सुरूवात झाली आहे. या संदर्भात, राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी माहिती दिली की, '9 ऑगस्ट रोजी ही यात्रा जम्मू आणि काश्मीर येथील आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये पोहोचतील, जिथे सांगली जिल्ह्यातील 1 हजार तरूण रक्तदान करतील'.
हेही वाचा: कोल्हापुरकरांना सुनावलं, शेट्टींवर संताप; हिंदुस्तानी भाऊ अंबानींच्या समर्थनात
स्वातंत्र्यपूर्व काळापासून सांगली जिल्ह्याला देशसेवेची मोठी परंपरा लाभलेली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी या गावातील प्रत्येक घरातील एक व्यक्ती सीमेवर देशसेवा करत आहे. त्यामुळे, या सैनिकांना मानवंदना म्हणून शिवसेना सिंदूर महारक्तदान यात्रा सुरू करणार आहे. 'देशभरातील एकूण 797 जिल्ह्यांपैकी सांगली हा असा एकमेव जिल्हा आहे, ज्याने स्वातंत्र्यानंतर अशा पद्धतीने देशभक्तीपर उपक्रम राबविला आहे' जिथे स्वातंत्र्यानंतर अशा प्रकारचे देशभक्तीपर उपक्रम राबविले गेले आहेत', अशी माहिती डॉ. सामंत यांनी दिली. 'पुढील वर्षभरात सिंदूर महारक्तदान यात्रा निघणार आहे. वायूसेना आणि नौदलाच्या रुग्णालयांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे. भारतीय सैन्याला आवश्यकता असेल त्या ठिकाणी जाऊन सांगलीकर रक्तदान करतील', असा विश्वास डॉ. सामंत यांनी व्यक्त केला आहे.
मंगळवारपासून, हे रक्तदाते धर्मवीर एक्सप्रेसने सांगली ते जम्मू-काश्मिर असा प्रवास करणार आहेत. शिराळा, वाळवा, कडेगाव, पलुस, खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, जत आणि मिरज तालुक्यातील सुमारे 1 हजारहून अधिक तरूण सिंदूर महारक्तदान यात्रेत रक्तदान करणार आहेत. 'हा उपक्रम आपल्यासाठी अत्यंत गौरवाचा, प्रेरणादायी प्रसंग असून भारतीय सैन्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा, देशभक्तीने भारावलेला प्रसंग आहे', अशी भावनिक प्रतिक्रिया डॉ. सामंत यांनी दिली.