मुंबई: मुंबईतील कांदिवलीमध्ये स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धेचे उद्घाटन भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या हस्ते करण्यात आले आहे. 3 ते 6 ऑगस्टदरम्यान खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. बौद्धिक दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून 139 स्पर्धक आणि त्यांच्यासोबत त्यांचे 50 कोचेस आणि एस्कॉर्टस एकूण 150 जणांचा समूह या ठिकाणी आला आहे.
हेही वाचा: पनवेल डान्सबार हल्लाप्रकरणी मनसे नेते योगेश चिलेसह आठ जण अटकेत
स्पर्धकासहित कोच आणि त्यांचं एस्कॉर्ट यासाठी एस ओ बी एम फेडरेशनकडून खाण्यापिण्यापासून निवासापर्यंत उत्कृष्ट अशी सोय करण्यात आलेली आहे. त्याबद्दल राज्यातून आलेल्या कोच आणि स्पर्धकांनी आभार व्यक्त केले. सरदार वल्लभ पटेल जलतरण तलावाचा आढावा मेधा किरीट सोमय्या यांनी घेतला. कांदिवली येथील सरदार वल्लभभाई पटेल तरणतलावात बौद्धिक दिव्यांग जलतरणपटूंनी सराव केला असून बौद्धिक दिव्यांना मुख्य प्रवाहात आणणाऱ्या स्पर्धेचे प्रायोजकत्व जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने स्वीकारले आहे. बौद्धिक दिव्यांग खेळाडूंना मुख्य प्रवाहात येण्याची जास्तीत जास्त संधी मिळावी हाच जय महाराष्ट्रचा या मागचा उद्देश आहे.