सोलापूर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शहरातील विमानसेवेच्या प्रश्नावर खासदार शिंदे यांनी पुन्हा एकदा पाठपुरावा सुरु केला आहे. सोलापुरातून लवकरात लवकर विमानसेवा सुरु व्हावी, यासाठी खासदार शिंदे यांनी शुक्रवारी केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री राममोहन नायडू किंजरापू यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन निवेदन दिले आहे. सोलापूरहुन थेट मुंबई, दिल्ली, हैदराबाद, तिरुपती यासारख्या शहरांमध्ये विमानसेवा सुरु करण्याची मागणीही प्रणिती शिंदे यांनी केली आहे.
हेही वाचा : ठाकरे बंधू एकत्र कारण काय?
सोलापूरातून तात्काळ विमानसेवा सुरु करा असे निवेदन खासदार प्रणिती शिंदे केंद्रीय नागरी वाहतूकमंत्र्यांना दिले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शहरातील विमानसेवेच्या प्रश्नावर खासदार शिंदे यांनी पुन्हा एकदा पाठपुरावा सुरु केला आहे. सोलापुरातून लवकरात लवकर विमानसेवा सुरु व्हावी, यासाठी खासदार शिंदे यांनी शुक्रवारी केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री राममोहन नायडू किंजरापू यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन निवेदन दिले आहे. सोलापूरच्या विकासासाठी विमानसेवा अत्यावश्यक असल्याचे या निवेदनात नमूद केले असून सोलापूरहुन थेट मुंबई, दिल्ली, हैद्राबाद, तिरुपती यासारख्या शहरांमध्ये विमानसेवा सुरु करण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.