Monday, September 01, 2025 12:07:14 PM

'सुरेश अण्णा धस भविष्यात मुख्यमंत्री व्हावेत'

सतीश भोसले याचे व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल होताना दिसत आहेत.

सुरेश अण्णा धस भविष्यात मुख्यमंत्री व्हावेत

बीड : सतीश भोसले याचे व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल होताना दिसत आहेत. अशातच खोक्या भोसलेचा नवा उपदव्याप समोर आला आहे. त्याने सुरेश धस यांच्याविषयी काही वक्तव्ये केली आहेत. 


दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर अद्यापही फरार असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये सतीश याचे अण्णा आता आमदार आहेत भविष्यात ते मुख्यमंत्री व्हावेत. कोणत्याही पक्षातून व्हावेत. काही घेणं देणं नाही असं म्हणणारे संभाषण व्हायरल झाल्याने याची चर्चा होऊ लागली आहे. 

हेही वाचा: 'महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस भूमिका घेणार'
दिवसेंदिवस सतीश भोसले याचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. आता त्याने आमदार धस यांच्याविषयी केलेल्या विधानाची चर्चा होताना दिसत आहे. सुरेश अण्णा धस भविष्यात मुख्यमंत्री व्हावेत असे वक्तव्य त्याने केले आहे. सतीश हा भाजपाचा कार्यकर्ता आहे. याआधीही त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये त्याने एका गरीब व्यक्तीला बॅटने मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्हायरल केला. तसेच सतीश अटक करण्याविषयीही त्यांनी भाष्य केले.    


सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पैशांचा बंडल फेकतानाचा सतीशचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल केला होता. या व्हिडीओजमुळे सतीश भोसले उर्फ खोक्याची बीडमधील दहशत पाहायला मिळत आहे. त्यातच दमानियांनी धसचा कार्यकर्त्या असल्याचे सांगत आमदार सुरेश धस यांच्यावर आरोप केले होते. या आरोपांवर प्रतिउत्तर देताना अलिकडच्या काळात सतीशसोबत ओळख झाल्याचे धस यांनी सांगितले. आमदार सुरेश धस यांनी सतीशसोबत अलिकडच्या काळात ओळख झाल्याची माहिती दिली होती. त्यातच आता सतिश उर्फ खोक्याने धसांविषयी केलेल्या विधानामुळे चर्चांना उधाण आले आहे. 


 


सम्बन्धित सामग्री