Monday, September 01, 2025 12:46:05 AM

शपथविधीची निमंत्रण पत्रिका चर्चेत

शपथविधीच्या निमंत्रण पत्रिकेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

शपथविधीची निमंत्रण पत्रिका चर्चेत

मुंबई : नवीन सरकारचा शपथविधी अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आज देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठी दावा केला. यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राजभवनावर दाखल झाले होते. गुरूवारी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शपथविधीच्या निमंत्रण पत्रिकेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. 

या निमंत्रण पत्रिकेत सगळ्यांना शपथविधी सोहळ्याला आमंत्रित राहण्याची विनंती मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या वतीने करण्यात आली आहे. या निमंत्रण पत्रिकेत राष्ट्रीय किंवा समारंभीय पोशाख घालण्याविषयी देखील सांगण्यात आले आहे.

 

निमंत्रण पत्रिकेतील आशय

या निमंत्रण पत्रिकेत मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तसेच उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी समारंभ गुरूवार, दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5.30 वाजता आझाद मैदान, फोर्ट,मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी आपण कृपया उपस्थित रहावे, अशी विनंती  

 

निमंत्रण पत्रिकेतील नियम

  1. ही निमंत्रणपत्रिका केवळ एका व्यक्तीकरिता आहे.
  2. समारंभस्थळी गेट क्रमांक 7 (महात्मा गांधी मार्ग) येथे प्रवेशासाठी ही निमंत्रणपत्रिका कृपया दाखवावी.
  3. सुरक्षेच्या दृष्टीने सायंकाळी 4.30 पर्यंत आसनस्थ होणे अनिवार्य आहे.
  4. कृपया भ्रमणध्वनी व्यतिरिक्त कोणतीही वस्तू सोबत आणू नये.
  5. ही निमंत्रणपत्रिका अहस्तांतरणीय आहे.

सम्बन्धित सामग्री