Wednesday, August 20, 2025 02:05:17 PM

'लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होणार'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना दिलासा दिला आहे.

लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होणार

नागपूर : हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. या दिवस सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले आहे. या भाषणात त्यांनी लाडक्या बहिणींना दिलासा दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही असे सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने राज्यातील लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे. तसेच लाडकी बहीण योजनेचे पैसे वेळेत मिळतील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

 

हेही वाचा : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज; 'या' तारखेला खात्यात जमा होणार पैसे

 

अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेविषयी सांगितले आहे. अधिवेशनानंतर बहिणींना हप्ता मिळणार असल्याचे महत्त्वपूर्ण वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारने महिलांना दरमहा 1500 रूपये देण्यास सुरूवात केली आहे. या रकमेत वाढ करून 2100 रूपये देण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींना नोव्हेंबरपर्यंतचा हप्ता मिळाला असून त्यांना डिसेंबर महिन्यातील हप्त्याची प्रतीक्षा होती. मात्र आता लाडक्या बहिणींची चिंता मिटणार आहे. लाडक्या बहिणींना अधिवेशनानंतर पैसे मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

 

 

 


सम्बन्धित सामग्री