नागपूर : राज्यात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर सभागृहात पहिल्यांदा भाषण केलं आहे. सर्वप्रथम त्यांनी महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेचे आभार मानले आहेत. तसेच मोदींच्या नाऱ्याला जनतेने प्रतिसाद दिला आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
'लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही'
सर्वप्रथम त्यांनी लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही. महायुतीने सुरू केलेल्या योजना बंद होणार नाहीत. हिवाळी अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना पहिला हप्ता मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. जनतेने आम्हाला मतदान केलं आणि निवडून आणलं. मी आधुनिक अभिमन्यू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
'विरोधकांनी पराभव स्विकार करावा'
शरद पवारांच्या वक्तव्यायं आश्चर्य वाटतं. शरद पवार पहिल्यांदा ईव्हीएमवर बोलले. जनतेनं महायुतीला मतदान केले. जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करू असे म्हणत एकप्रकारे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन जनतेला दिले आहे. विधानसभा निकालानंतर महायुतीचा बहुमताने विजय झाला. त्यानंतर महायुतीच्या विजयावर विरोधकांनी ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर खुल्या मनाने जनतेचा जनादेश स्विकारा. विरोधकांनी ईव्हीएम हटाव रॅलीही काढली. विरोधकांनी पराभव स्विकार करावा असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.
इतर देशांना आपला खांदा देऊ नका. आम्ही छत्रपतींच्या विचारांचे वारसदार आहोत. महाराष्ट्र कायम प्रथम क्रमांकावर राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. यावेळी टोयोटाचा नवीन प्रकल्प महाराष्ट्रात येतं असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. राज्यातील मराठी शाळा सुरु ठेवायच्या आहेत. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा आमचा संकल्प असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मेट्रो- 3 चा पहिला टप्पा सुरु झाला आहे. मे - 2025 पर्यंत भुयारी मेट्रो सुरु होणार आहे. शेतकऱ्यांसाठी सौरऊर्जा प्रकल्प उपलब्ध करणार आहे. पुणे - नागपूर मेट्रोचं काम वेगानं सुरु आहे. शेतकऱ्यांकडून विजेचं बिल घेणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. वाढवण बंदरामुळे अनेक फायदे होणार आहेत. नाशिकमध्ये आयटी पार्क उभारण्याची सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र यांनी सभागृहातील भाषणाच्या माध्यमातून सांगितले आहे.