दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आपचे अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाल्याच पाहायला मिळालं. भाजपाचे प्रवेश वर्मा आणि आपचे अरविंद केजरीवाल यांच्यात दिल्ली विधानसभेत लढत पाहायला मिळाली. यात अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला त्यामुळे आपला मोठा धक्का बसलाय. 27 वर्षानंतर भाजपने दिल्लीची सत्ता काबीज करण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. या निकालादरम्यान, ‘आप’साठी एक धक्कादायक निकाल आला. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. नेमकं या पराभवाची कारण काय पाहुयात:
हेही वाचा: पराभवानंतर अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया
आपच्या पराभवाची कारणं कोणती?
1.दिल्लीतील कथित मद्य घोटाळा 'आप'ला महागात पडल्याची चर्चा
2.सर्व घोटाळ्याचे मुद्दे निवडणुकीत प्रभावीपणे वापरण्यात भाजपा यशस्वी
3.INDIA आघाडीचे नेते प्रचारात कुठेच दिसले नाहीत
4.शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादवांनी 'आप'ला पाठिंबा दिला होता
5.मात्र 'आप'च्या प्रचाराला इंडिया आघाडीतील कोणताही दिग्गज नव्हता
6.काँग्रेससोबत केजरीवालांनी आघाडी न केल्याचा फटका देखील फटका
7.भाजपचं सूक्ष्म नियोजन, केंद्रीय मंत्री, सर्व राज्याचे मुख्यमंत्री प्रचारात उतरले
8.भाजपानं ज्या भाषिकांची जास्त लोकवस्ती त्या ठिकाणी त्या त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या सभा घेतल्या
9.मुस्लिम बहुल इलाक्यात विश्वास निर्माण करण्यात भाजप यशस्वी
10.आपचं दलित मुस्लिम प्रेम फक्त कागदावरच राहिलं
11.प्रत्यक्षात मुस्लिमांसाठी आपनं काहीच केलं नाही, यामुळे फटका
हेही वाचा: जरांगेचं पुन्हा साखळी उपोषण
दरम्यान या पराभवनानंतर अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिलीय. 'आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. जनतेचा जो निर्णय आहे तो आम्ही पूर्ण विनम्रतेने स्विकारत आहोत. मी भारतीय जनता पार्टीचे विजयाबद्दल अभिनंदन करु इच्छितो. दिल्लीच्या जनतेने ज्या आशा आणि अपेक्षा ठेवून त्यांना बहुमत दिले आहे, त्या ते पूर्ण करतील अशी मला आशा आहे.'
'मागील दहा वर्षात जनतेने आम्हाला संधी दिली. त्या कार्यकाळात आम्ही अनेक विकास कामे केली. खास करुन शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये काम केले. लोकांना दिलासा देण्याचा आम्ही अनेक मार्गांनी प्रयत्न केला. दिल्लीतील पायाभूत सुविधांमध्येही सुधारणा करण्याचा आम्ही प्रयत्न केला', असे वक्तव्य केजरीवाल यांनी केले.