2024 रोजी देशभरात लोकसभा निवडणूका झाल्या. महाराष्ट्रांत लोकसभा निवडणूका पाच टप्प्यात पार पडल्या. पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणूका महाराष्ट्र राज्यातील रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली - चिमूर आणि चंद्रपूरमध्ये पार पडला. दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूका महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणीमध्ये पार पडला. तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूका महाराष्ट्र राज्यातील रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी - सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये पार पडला. चोथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूका महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहिल्यानगर (पूर्व अहमदनगर), शिर्डी आणि बीडमध्ये पार पडला. तर पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणूका महाराष्ट्र राज्यातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर - पश्चिम, मुंबई उत्तर - पूर्व, मुंबई उत्तर - मध्य, मुंबई दक्षिण - मध्य, आणि मुंबई दक्षिणमध्ये पार पडल्या.
बऱ्याचदा जेव्हा लोकसभा निवडणूक जवळ येते तेव्हा अनेक न्यूज चॅनेल्सवर आपण ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल पाहतो. तेव्हा तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल आणि ते म्हणजे ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल म्हणजे काय? आणि याचा वापर कशासाठी केला जातो? चला तर मग सुरूवात करूया ओपिनियन पोल पासून.
हेही वाचा: MVA Meeting: महाविकास आघाडीच्या बैठकांचा सिलसिला
ओपिनियन पोल म्हणजे काय?
ओपिनियन पोल हे मतदानाच्या आधी केला जातो. ओपिनियन पोलमध्ये सर्वसामान्य जनतेपासून ते अगदी उमेदवार, विविध राजकीय नेत्यांकडून कोणत्या पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता आहे याच्याबद्दल चर्चा केली जाते. ग्राफिक्स, बार चार्ट्सद्वारे याची माहिती दिली जाते. मात्र बऱ्याचदा ओपिनियन पोलमध्ये गोंधळ निर्माण होतो. मतदानापूर्वी ओपिनियन पोल घेतल्यामुळे त्याचे निष्कर्ष काही प्रमाणांत बदलण्याची शक्यता असते.
एक्सिट पोल म्हणजे काय?
एक्झिट पोलमध्ये मतदान करून बाहेर आल्यानंतर मतदारांना त्यांनी नेमकं कुणाला मतदान केलं आहे याची माहिती घेतात. या माहितींच्या आधारे डेटा गोळा केला जातो. नियमांनुसार निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर कोणताही एक्झिट पोल किंवा सर्वेक्षण जाहीर करता येत नाही. मात्र मतदानाचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर जेव्हा संध्याकाळी मतदान पार पडतो, त्याच्या अर्ध्या तासातच एक्झिट पोल जाहीर केला जाऊ शकतो.