हिंदू पंचांगनुसार होळीचा सण:
हिंदू पंचांगनुसार होळी सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमाला साजरा केला जातो. या दिवशी होलिका दहनाची परंपरा आहे, जे वाईटावर विजय मिळवण्याचे प्रतीक आहे. यावर्षी होलिका दहनाच्या दिवशी भाद्रची सावली असणार आहे. ज्यामुळे शुभ मुहूर्तामध्ये वेळेची कमी होईल. ऋषिकेश पंचांगानुसार, ऋषिकेश पंचांगनुसार, फाल्गुन महिन्याची पौर्णिमा 13 मार्च रोजी सकाळी 10:02 वाजता असेल. या दिवशी भाद्रची सावलीही असेल, जे रात्री 10.44 वाजता संपेल. ज्योतिषांनी दिलेल्या माहितीप्रमाणे भाद्र काळात होलिका दहन करणे अशुभ असते. त्यामुळे भाद्र संपल्यानंतर होलिका दहनाचा शुभ मुहूर्त सुरू होईल. भाद्र अशुभ मानली जाते. या काळामध्ये कोणत्याही प्रकारच्या शुभ कार्य न करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र या फाल्गुन पौर्णिमेला भाद्रची सावली असल्यामुळे होलिका दहनाचा शुभ मुहूर्त मध्यरात्री असेल.
होलिका दहना करण्यासाठी शुभ मुहूर्त:
पौर्णिमा तिथीची सुरुवात: 13 मार्च, रात्री 10:02 पासून.
भाद्र समाप्ती: 13 मार्च, रात्री 10:44 वाजता.
होलिका दहनाची शुभ मुहूर्त:
13 मार्च 2025 रोजी रात्री 10:44 नंतर.
मध्यरात्री फक्त 1 तास 4 मिनिटे शुभ मुहूर्त.
भाद्रा संपते: मध्यरात्रीनंतर.
शुभ कालावधी: 1 तास 4 मिनिटे.
हेही वाचा: Rashibhavisha 3 March 2025 : जाणून घ्या काय सांगते 'या' 4 राशींचे राशिभविष्य
होलिका दहनाचे नियम आणि पद्धत:
भाद्र संपल्यानंतरच होलिका दहन करावे. होलिका दहन 13 मार्च रोजी रात्री रात्री 10:44 नंतर शुभ मुहूर्त बघून करावे. पूजा केल्यानंतर, होलिकेच्या भवती प्रदक्षिणा घालावे आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करावे. यावर्षी 3 मार्च रोजी भाद्रच्या सावली असल्यामुळे होलिका दहनाचा शुभ मुहूर्त कमी झाला असून हा मुहूर्त फक्त 1 तास 4 मिनिटांचा असेल.
होलिका दहनाचे महत्व:
होलिका दहन साजरा करण्यामागची धार्मिक श्रद्धा आहे. अशी मान्यता आहे की याच दिवशी विष्णूदेवांनी भक्त प्रल्हादच्या रक्षणासाठी होलिका नष्ट केली होती. हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून भारतातील अनेक राज्यांमध्ये साजरा केला जातो. या दिवशी लोक होलिकेत जुन्या आणि नकारात्मक गोष्टी अर्पण करतअसतात आणि जीवनामध्ये नवीन ऊर्जा आणि सकारात्मकतेचे आगमन व्हावे यासाठी प्रार्थना करतात.
ज्योतिष तज्ज्ञांचे मत:
ज्योतिषांच्या मते, भाद्रमध्ये होलिका दहन केल्यामुळे अशुभ परिणाम मिळण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे ज्योतिष तज्ज्ञ होलिका दहन फक्त शुभ मुहूर्तावरच करण्याचा सल्ला देतात.
हेही वाचा: 'या' मंदिरातील दरवाजा उघडताच होईल जगाचा नाश
होळीचा सण कधी साजरा करतात:
होलिका दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी होळीचा सण साजरा केला जातो. यावर्षी 14 मार्च रोजी शुक्रवारी आनंदात आणि जल्लोषात होळी साजरी केली जाईल. या दिवशी लोक एकमेकांवर विविध रंग आणि गुलाल उधळतात. अशाप्रकारे होळीचा सण साजरा करतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)