Raksha Bandhan 2025: बहीण-भावांचं नातं दृढ करणारा रक्षाबंधनाचा सण यंदा 9 ऑगस्ट 2025 रोजी साजरा केला जाणार आहे. या वर्षी रक्षाबंधनवर भद्रकाळाची अशुभ छाया नाही, त्यामुळे बहिणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही राखी बांधू शकतात. दरवर्षी बहिणीला भावासाठी छानशी राखी घेण्याची असते. पण तऱ्हेतऱ्हेच्या राख्या पाहून संभ्रमात पडायला होते.
तुम्ही जर भावासाठी कोणती राखी घ्यावी, याच्या विचारात असाल तर तुम्ही भावाची रास कोणती आहे, हे जाणून घ्या. भावाला त्याच्या राशीनुसार लकी रंगाची राखी बांधली तर त्याचं नशीब आणखी चमकेल. त्याला नशिबाची साथ मिळेल. तर, कोणत्या कोणत्या राशीसाठी कोणता रंग सर्वात शुभ राहील ते जाणून घेऊया.
मेष आणि वृश्चिक - तुमचा भाऊ मेष किंवा वृश्चिक राशीचा असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी लाल रंगाची राखी खरेदी करावी. राखी पूर्णपणे लाल नसली तर, त्याचा काही भाग तरी लाल असावा. या दोन्ही राशींसाठी लाल रंग खूप भाग्यवान मानला जातो.
वृषभ आणि तूळ - शुक्र स्वामी असलेल्या वृषभ आणि तूळ राशीच्या लोकांना पांढऱ्या किंवा क्रिमी रंग शुभ ठरतो. तुमचा भाऊ यापैकी एका राशीचा असेल तर राखी घेताना त्यामध्ये पांढरा किंवा क्रीम रंग असू द्या.
मिथुन आणि कन्या - बुध स्वामी असलेल्या या दोन्ही राशींसाठी हिरवा रंग खूप शुभ आहे. भावाची यापैकी कोणतीही राशी असेल तर तुम्ही त्याला हिरव्या रंगाची राखी बांधावी.
कर्क - चंद्र स्वामी असलेल्या कर्क राशीच्या लोकांसाठीही पांढरा रंग खूप शुभ मानला जातो. या राशीच्या भावासाठी पांढऱ्या रंगाची राखी खरेदी करावी किंवा त्यात पांढरा रंग असलेली राखी खरेदी करावी.
हेही वाचा - Raksha Bandhan 2025 : रक्षाबंधनावेळी अशी चूक करू नका; नाहीतर, बहीण-भावाच्या नात्यात पडू शकते दरी
सिंह - जर तुमचा भाऊ सिंह राशीचा असेल तर त्याच्यासाठी गुलाबी किंवा लाल रंगाची राखी लाभदायी ठरेल. सिंह राशीसाठी हे रंग शुभ मानले जातात.
धनु आणि मीन - भावाची धनु किंवा मीन रास असेल तर तुम्ही त्याच्यासाठी पिवळ्या रंगाची राखी खरेदी करावी. भावाच्या मनगटावर या रंगाची राखी बांधल्यानं त्याच्या आणि तुमच्या आयुष्यात अनेक शुभ परिणाम मिळतील.
मकर आणि कुंभ - शनी ग्रह स्वामी असलेल्या मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी निळा किंवा जांभळा रंग शुभ ठरतो. तुमचा भाऊ यापैकी एका राशीचा असेल, तर त्याला वरती सुचवलेल्या रंगाची राखी बांधावी. मकर-कुंभ राशीच्या भावांच्या मनगटावर या रंगाच्या राख्या बांधल्या तर त्यांना जीवनात यश-धन मिळेल.
हेही वाचा - Vastu Tips : घरात अचानकपणे माकड येणं शुभ आहे की अशुभ?
(Disclaimer : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)