बेतुल: भारतात अनेक मंदिरे आहेत. तसेच, याठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी जात असतात. भारतातील अनेक मंदिरे केवळ पूजा अर्चेसाठी नाही तर तेथे घडणार्या चमत्कारासाठी प्रसिद्ध आहेत. भारतात असेही एक मंदिर आहे जिथे केशर आणि चंदनाचा पाऊस पडतो. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
हेही वाचा: 'मशिदीवरील भोंग्यांबाबत अजित पवारांची दादागिरी चालणार नाही' - किरीट सोमय्या
'या' मंदिरात पडतो केशर आणि चंदनाचा पाऊस:
मध्य प्रदेश राज्यातील बैतुल जिल्ह्यात सातपुडा पर्वतांच्या घनदाट जंगलांमध्ये मुक्तागिरी धाम नावाचे एक सुंदर मंदिर आहे. हे मंदिर निसर्गाच्या कुशीत वसलेले अद्भुत आणि चमत्कारी मंदिर आहे. माहितीनुसार, हजारो वर्षांपूर्वी येथे एक मुनी ध्यान करत होते. तेव्हा पर्वतावरून पडल्याने एका बेडकाचा मृत्यू झाला. तेव्हा, या बेडकाच्या कानात मुनींनी मंत्राचा जप केला आणि तो बेडूक स्वर्गात पोहोचला. त्यामुळे या पर्वताचे नाव 'मेढागिरी पर्वत' पडले.
असे म्हटले जाते की स्वर्गात गेलेला हा बेडूक जेव्हा ऋषीमुनींना भेटण्यासाठी येथे आला तेव्हा चंदन आणि केशरचा पाऊस पडला. तेव्हापासून दर अष्टीला चंदन आणि केशरचा पाऊस याठिकाणी पडतो. या पर्वतावर लहान आणि मोठी अशी 52 मंदिरे असून त्यापैकी मुक्तगिरी सर्वात प्रसिद्ध आहे. या मंदिरात जाण्यासाठी 600 पायर्या चढाव्या लागतात.
(DISCLAIMER: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)