Wednesday, August 20, 2025 09:19:27 AM

Shravan 2025: आरोग्याच्या दृष्टीने श्रावण महिना कशाप्रकारे फायदेशीर ठरू शकतो?

श्रावण महिन्यात अनेक धार्मिक परंपरा, व्रत, उपवास करून महादेवांची पूजा करतात. मात्र, ही केवळ अंधश्रद्धा नाही तर त्यामागे अनेक वैज्ञानिक कारणे देखील लपलेली आहेत.

shravan 2025 आरोग्याच्या दृष्टीने श्रावण महिना कशाप्रकारे फायदेशीर ठरू शकतो

मुंबई: महाराष्ट्रासह इतर भागांमध्ये शुक्रवारपासुन श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. श्रावण महिना हा केवळ धार्मिक विधी आणि व्रतवैकल्याचा काळ नाही तर आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीनेही खूप महत्त्वाचा आहे. या काळात, अनेक धार्मिक परंपरा, व्रत, उपवास करून महादेवांची पूजा करतात. मात्र, ही केवळ अंधश्रद्धा नाही तर त्यामागे अनेक वैज्ञानिक कारणे देखील लपलेली आहेत. चला तर सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: लोकल अपघातात 26 हजार प्रवाशांचा मृत्यू; अन् रेल्वेकडून आर्थिक मदत फक्त 1400 कुटुंबीयांना

श्रावण महिन्यात पावसाची तीव्रता वाढते. यासह, हवामानातील आर्द्रता आणि थंडीमुळे शरीराची पचनशक्ती कमी होते. म्हणून या काळात हलका आहार, उपवास आणि पथ्यांचे पालन केले जाते. माहितीनुसार, उपवास केल्याने पचनसंस्था विश्रांती घेते आणि शरीर डिटॉक्स होते. या काळात वातावरणात बुरशी आणि जीवाणू वाढतात. त्यामुळे, तुळशी, बाळ आणि दुर्वा यासारख्या औषधी वनस्पतींचा वापर पूजेमध्ये केला जातो. यासह, शिवलिंगाची पूजा करताना दूध, मध, तूप, दही आणि साखर अर्पण केली जाते. याला 'पंचामृत' म्हणतात. हे पंचामृत शरीराला ऊर्जा देणारे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक देखील आहे. श्रावण महिन्यात, बरेच लोक पूजा करतात आणि हरितालिका, नागपंचमी आणि रक्षाबंधन सारखे सण आनंदाने साजरा करतात. त्यामुळे, श्रावण महिना वैज्ञानिक दृष्टिकोनातून आरोग्यदायी जीवनशैलीचा महत्त्वाचा काळ मानला जातो. 

श्रावणी सोमवारचे महत्त्व

देवशयनी एकादशीला भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योगनिर्देत जातात. त्यामुळे, चातुर्मास काळात ब्रह्मांडाचे पालकत्व महादेवांकडे असते. तसेच, श्रावण महिना हा महादेवांची पूजा करण्यासाठी, त्यांचे नामस्मरण आणि उपासना करण्यासाठी महत्वाचा आणि शुभ मानला जातो. यासोबतच, सोमवार हा भगवान शिवाचा दिवस असल्याने, श्रावणातील प्रत्येक सोमवारचे विशेष महत्त्व आहे. श्रावणी सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक, दुधाभिषेक, रुद्राभिषेक आणि पंचामृत अभिषेकही मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच, दर सोमवारी भगवान शिवाला अर्पण केल्या जाणाऱ्या शिवामुठीचेही वेगळे महत्त्व आहे.

लग्न झाल्यानंतर, महाराष्ट्रातील स्त्रिया पहिली पाच वर्षे सलग शिवलिंगावर शिवामुठ वाहण्याचे व्रत करतात. या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास केला जातो. शिवलिंगाची पूजा केल्यानंतर, दर सोमवारी शिवलिंगावर पुढील क्रमाने मूठभर धान्य अर्पण केले जाते: तांदूळ, तीळ, मूग, जलपेनो आणि सातू. ही मूठ वाहताना, 'नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने। शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे।।' असा मंत्र म्हणावा. तसेच, पाच वर्षांनी उपवास सोडावा. असे म्हटले जाते की, विधीनुसार शिवलिंगाची पूजा करून तसेच, ब्राह्मण आणि नातेवाईकांना शक्य तितके अन्न, भेटवस्तू आणि दक्षिणा देऊन या व्रताची समाप्ती करावी.

'या' दिवशी असणार पहिला श्रावणी सोमवार

28 जुलै 2025 रोजी, पहिला श्रावणी सोमवार आहे. या दिवशी शिवलिंगावर मुठभर तांदूळ अर्पण करावे. 

04 ऑगस्ट 2025 रोजी, दुसरा श्रावणी सोमवार आहे. या दिवशी शिवलिंगावर मुठभर तीळ अर्पण करावे. 

11 ऑगस्ट 2025 रोजी, तिसरा श्रावणी सोमवार आहे. या दिवशी शिवलिंगावर मुठभर मूग अर्पण करावे. 

18 ऑगस्ट 2025 रोजी, चौथा श्रावणी सोमवार आहे. या दिवशी शिवलिंगावर मुठभर जव अर्पण करावे. 

(DISCLAIMER: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)


सम्बन्धित सामग्री