शनिवारचे उपाय : हिंदू धर्मात शनिवार हा शनिदेवाच्या पूजेसाठी विशेष दिवस मानला जातो. शनिदेवाला न्यायाची देवता म्हटले जाते. या दिवशी शनिदेवांची पूजा विधिवत केली जाते. त्याशिवाय काही लोक त्यांच्या नावाने उपवासही ठेवतात. असे म्हटले जाते की शनिदेवाची पूजा केल्याने संकटांपासून मुक्तता मिळते आणि जीवनात आनंद मिळतो.
याशिवाय, शनिमहारांना प्रसन्न करून घेण्यासाठी ज्योतिषशास्त्रात शनिवारी करण्याच्या विशेष उपायांची तरतूद आहे. असे मानले जाते की, या उपायांचे पालन केल्याने साधकाला इच्छित फळ मिळू शकते. जर शनीची साडेसाती चालू असेल तर, हे उपाय आणखी फायदेशीर ठरू शकतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही तुमच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि प्रगती हवी असेल, तर शनिवारी हे 5 खास उपाय करा.
हेही वाचा - Maghi Amavasya 2025: माघी अमावस्या नेमकी कधी, 27 की 28 फेब्रुवारी? जाणून घ्या, स्नान-दान, श्राद्ध-तर्पण यासाठी शुभ वेळा
पिंपळाच्या पानांपासून हार बनवून अर्पण करणे
शनिवारी, पिंपळाच्या झाडाची 11 पाने घ्या आणि त्यांचा हार बनवून शनिमहाराजांना अर्पण करा. शनिदेवांच्या मंदिरात हा हार अर्पण करताना 'ओम श्रीं ह्रीं शं शनैश्चराय नमः' या मंत्राचा जप करा. यामुळे शनीच्या साडेसातीपासून आराम मिळू शकतो आणि जीवनात सुधारणा होऊ शकते.
पिंपळाच्या झाडाभोवती धागा गुंडाळणे
शनिवारी, पिंपळाच्या झाडाभोवती कच्चा कापसाचा दोरा गुंडाळा. गुंडाळताना सात फेऱ्या होऊ द्या. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि पूजक मानवाच्या समस्या दूर करतात, असे मानले जाते.
काळे कापड आणि इतर वस्तू दान करा
शनिवारी काळे चणे, काळे उडीद आणि काळे कापड दान करणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की, यामुळे नकारात्मकता दूर होते आणि जीवनात आनंद आणि शांती येते.
मोहरीच्या तेलाचा दिवा
शनिवारी संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे खूप फायदेशीर आहे. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाहते. असा दिवा लावल्यामुळे शनिदोष कमी करता येतो.
पिंपळाच्या झाडाखाली गूळ आणि हरभरा अर्पण करणे
शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली गूळ आणि हरभरा अर्पण करा किंवा हे तुम्ही कावळे, कुत्री या मुक्या प्राण्याना खायला घालू शकता. तसेच, गरीब-गरजू लोकांमध्येही वाटू शकता. असे मानले जाते की, यामुळे तुमचे भाग्य उजळू शकते आणि तुम्हाला शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो.
हेही वाचा - Mahashivratri 2025: तब्बल दीडशे वर्षानंतर महाशिवरात्रीला दुर्लभ योग; या राशींना मिळणार सर्व सुखं! बरसेल पैसाच पैसा!
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)