Bollywood Actress Nushrratt Bharuccha : बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचाला अंकशास्त्राबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला होता, ज्याच्या उत्तरात तिने सांगितले की, ती लहानपणापासून मंदिरात जात आहे. याशिवाय तिने 16 शुक्रवारी उपवासही ठेवला आहे. तिने असेही सांगितले की तिने केदारनाथ आणि बद्रीनाथलाही भेट दिली आहे. नुसरत मुस्लीम धर्मीय असून ती मूळची दाऊदी बोहरा समाजातील आहे.
बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा अंकशास्त्रावर विश्वास ठेवते. म्हणूनच तिने तिच्या नावाचे स्पेलिंग बदलून घेतले आहे. तिने तिचे नाव नुसरत भरुचा (Nushrat Bharucha) वरून बदलून Nushrratt Bharuccha असे केले आहे. याविषयी अलीकडेच, नुसरतला विचारण्यात आले की, ती मुस्लीम कुटुंबातील असल्याने, तिच्या घरी अंकशास्त्राबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले नव्हते का?
हेही वाचा - केदारनाथ यात्रेदरम्यान 'या' ठिकाणांनाही नक्की भेट द्या; मन होईल प्रसन्न
एका मुलाखतीदरम्यान जेव्हा तिला विचारण्यात आलं की, तुम्ही मुस्लिम आहात, मग मंदिरात जाण्याबाबत घरातून काही प्रश्न झाले नाहीत का? नुसरत यावर बोलताना म्हणाली, "लहानपणापासून मी मंदिर, गुरुद्वारा आणि चर्चमध्ये जात आहे. मी 16 शुक्रवारी उपवासही करत असे." मुलाखतीत नुसरतला ती केदारनाथला का गेली होती, असे विचारण्यात आले.
नुसरत म्हणाली, "केदारनाथ आणि बद्रीनाथ, मला खरोखर दोन्ही ठिकाणी जायचे होते. मला तिथे दर्शनासाठी जायचे होते. मला तिथे डोके टेकवायचे होते, आशीर्वाद घ्यायचे होते आणि शांतीचा अनुभव घ्यायचा होता." नुसरत पुढे म्हणाली, "जेव्हा तुमचा एखाद्या गोष्टीवर विश्वास असतो, तेव्हा ती तुमच्या आत्म्याला स्पर्श करते, ती गोष्ट व्यक्त करता येत नाही. जेव्हा मी केदारनाथला गेले होते तेव्हा, मला फक्त तिथे बसायचे होते. मी काही मागितलं नाही."
तिला केदारनाथला जाण्यासाठी कशामुळे प्रेरणा मिळाली असे देखील विचारण्यात आले. यावर ती म्हणाली, "मला माहीत नाही. मला आतला सांगत होता त्यामुळे मी तिथे गेले. मी वैष्णोदेवीलाही गेले आहे. फक्त डोके टेकवले नाही; तर, मी पायऱ्याही चढले. मी 13 किलोमीटर चालले, दर्शन घेतले आणि परत आले."
हेही वाचा - Nautapa 2025 : 25 मे पासून सुरू होणार नौतपा; जाणून घ्या, म्हणजे काय आणि किती दिवस होणार उष्णतेचा त्रास..
नुसरत म्हणाली, "माझ्या मनात कोणताही तर्क नव्हता, माझ्या मनात आले की, मला जावेच लागेल. जर मला वाटले की, मला एखादे काम करायचे आहे, तर मी ते काम करतेच. मग मी कोणाचं ऐकत नाही, मी जास्त विचार करत नाही. माझ्या मनात एक इच्छा येत होती की, मला तिथे जायचं आहे. मला माहीत नाही की, ही इच्छा कुठून आली.. ती काही आध्यात्मिक शक्ती असू शकते किंवा आणखी काही."
या संभाषणात नुसरतने असेही म्हटले की, सुरुवातीला तिथे पोहोचण्यात अडथळे आले, परंतु नंतर गोष्टी सोप्या झाल्या आणि ती तिथे पोहोचली. ती असेही म्हणाली, "तिथे पोहोचल्यानंतर मला वाटले की, जसे मला इथे बोलावण्यात आले आहे आणि म्हणूनच मी इथे आले आहे."