महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्री हा अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी माता पार्वती आणि महादेव यांचा विवाह देखील संपन्न झाला होता. त्यामुळे महाशिवरात्रीचे हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भाविक महादेव आणि माता पार्वती यांची विशेष पूजा करतात. शिवभक्तांसाठी हा दिवस मोठ्या उत्सवांप्रमाणेच आहे. या दिवशी शिवभक्त लाखोंच्या संख्येने महादेवांच्या मंदिरात जाऊन त्यांची विविध प्रकारे पूजा करतात जसे की रुद्राभिषेक, पंचाभिषेक, जलाभिषेक इत्यादी. या दिवशी भाविक मोठ्या संख्येने उपवास करतात. या वर्षी महाशिवरात्री चा पर्व बुधवारी साजरा केला जाईल. महादेवांचे जलाभिषेक बुधवारी सकाळी 11:08 पासून ते शत्रू संहारक परीघ योग आणि शुभ चोघडियाला सुरुवात होईल. धार्मिक ग्रंथ निर्णयसिंधु, धर्मसिंधु, स्कंद पुराण, लिंग पुराण और नारद संहिता यांच्या नुसार फाल्गुन कृष्ण पक्ष च्या चतुर्दशी तिथि, मध्यरात्रीच्या आधी आणि नंतर होते. ज्योतिषशास्त्रानुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव काही विशेष राशींनां आशीर्वाद देणार आहेत. जाणून घेऊया या शुभ मुहूर्तावर कोणत्या राशींना विशेष लाभ मिळणार आहेत.
1 - मेष राशी: मेष राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्री महत्त्वपूर्ण बदल घडवू शकते. महाशिवरात्रीच्या काळात करिअर आणि व्यवसायमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे आणि उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्येदेखील वाढ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आरोग्यामध्ये सुधारणा होत राहील, त्यामुळे घरात सुख-शांती राहील.
उपाय - तांब्याच्या भांड्यात गूळ आणि लाल चंदन टाकून शिवलिंगाचा अभिषेक करावा. असे केल्याने सौभाग्य वाढण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला महादेवांची कृपा प्राप्त होईल.
2 - कर्क राशी: कर्क राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्री खास फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमच्या कामात यश मिळेल. महाशिवरात्री दरम्यान कर्क राशीच्या लोकांना जुन्या कर्जातून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे.
उपाय - अधिक लाभ मिळविण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी चांदीच्या भांड्यातून भगवान शंकराला दूध अर्पण करा, यामुळे शुभ परिणाम मिळतील.
3 - मिथुन राशी: मिथुन राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. कारण शनि तुमच्या राशीपासून नवव्या घरात आहे आणि शुक्र तुमच्या राशीतून करिअर आणि व्यवसायाच्या स्थानी जाणार आहे. त्यामुळे या काळात नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. तसेच, यावेळी जर तुम्ही मीडिया, मार्केटिंग किंवा कम्युनिकेशन क्षेत्राशी संबंधित असाल तर तुम्हाला विशेष फायदा होईल. यावेळी नशीबदेखील तुमची साथ देईल. तसेच तुम्ही देश-विदेशातही प्रवास करू शकता. त्याच वेळी, आपण कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
हेही वाचा: महाशिवरात्रीच्या दिवशी 'या' मंत्रांचा जाप केल्यास महादेव होतील प्रसन्न
(Disclaimer - ही बातमी फक्त तुम्हाला जागृत करण्यासाठी आणि माहितीसाठी लिहिली आहे. हे लिहिताना आम्ही सामान्य माहितीची मदत घेतली आहे. जय महाराष्ट्र याची जबाबदारी घेत नाही.)