Thursday, August 21, 2025 03:36:35 AM

MAHASHIVRATRI 2025: महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंग कोणते आहेत?

महाशिवरात्री हा दिवस महादेवांना प्रसन्न करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो. महाराष्ट्रात देखील काही ज्योतिर्लिंग आहेत जे आपण जाणून घेणार आहोत.

mahashivratri 2025 महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंग कोणते आहेत

महाशिवरात्री हा दिवस महादेवांना प्रसन्न करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो. अशी मान्यता आहे की महाशिवरात्री दरम्यान माता पार्वती आणि महादेव यांचा विवाह देखील झाला होता. भारतातल्या अनेक राज्यात महाशिवरात्री वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतो. यादिवशी भारतातील अनेक राज्यात महादेवांच्या ज्योतिर्लिंगला भाविकांची गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळणार. गुजरातमढील सोमनाथ ज्योतिर्लिंग तर उज्जैनमधील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग याप्रमाणेच   महाराष्ट्रात देखील काही ज्योतिर्लिंग आहेत जे आपण जाणून घेणार आहोत. 


1 - भीमाशंकर:

भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे पुणे जिल्ह्यातील भोरगिरी गावात आहे. सह्याद्रीच्या डोंगरामध्ये वसलेले हे ज्योतिर्लिंग सुंदर आणि पवित्र ठिकाण आहे. इथल्या भीमा नदीच्या नावाने भीमाशंकरचे नाव पडले. याच गावात महादेव आणि राक्षस त्रिपुरासुराचे युद्ध देखील झाले. ज्यामध्ये महादेवांनी राक्षस त्रिपुरासुराला मारून टाकले. त्यामुळे इथल्या गावकरांनी महादेवांना कायमस्वरूपी इथे स्थायिक होण्यासाठी विनंती केली. ज्यामुळे महादेवांनी या गावामध्ये ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात कायमस्वरूपी वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला. 

हेही वाचा: Chardham Yatra 2025: चारधाम यात्रा 30 एप्रिलपासून सुरू होणार; नोंदणी कधी सुरू होणार? जाणून घ्या

2 - परळी वैजनाथ: 

परळी वैजनाथ भारतातील बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक असून हे ठिकाण पवित्र आहे. हे ज्योतिर्लिंग सुमारे ३० हजार वर्ष जुने आणि प्राचीन मंदिर आहे. हे ठिकाण महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात आहे. हे मंदिर जागृत आहे अशी मान्यता देखील असल्याचे पाहायला मिळते. महाशिवरात्रीच्या दिवशी वैद्यनाथ जयंती देखील असते. मंदिराचे जीर्णोद्धार राणी अहिल्याबाई होळकर यांनी केले आहे. औषधी वनस्पतींनी परिपूर्ण असलेल्या हिरव्यागार जंगलात असलेल्या एका लहान टेकडीवर स्थित आहे. 

3 - औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग:

महाराष्ट्रातील औंढा नागनाथ पवित्र ज्योतिर्लिंग असून या ठिकाणाला ऐतिहासिक महत्व आहे. मान्यतेनुसार ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर यांनी त्यांच्या १४ वर्षांच्या वनवासात हे मंदिर बांधले होते. मंदिराचे वैशिष्ट म्हणजे या मंदिरात नंदीची मूर्ती नसल्यामुळे हे ज्योतिर्लिंग इतर ज्योतिर्लिंग मंदिरांपासून वेगळी बनवते. औरंगजेब जेव्हा विजयी झाला तेव्हा त्याने या मंदिराला जमीनदोस्त केले होते ज्यामुळे अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराला नव्याने पुन्हा बांधले. 

हेही वाचा: Kedarnath Temple : केदारनाथ मंदिराचे उत्पन्न तीन वर्षांत अडीच पटीने वाढले, जाणून घ्या किती झाली कमाई

4 - घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग:

घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग अजिंठा वेरूळ लेण्यांजवळ असल्यामुळे या मंदिराचे विशेष महत्व आहे. हे मंदिर भारतातील सर्वात लहान ज्योतिर्लिंग असून देखील हे मंदिर लवचिकतेचे प्रतीक आहे. मुघलांनी वारंवार या मंदिरास केले. मात्र मुघलांच्या विध्वंसानंतर अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराची पुनर्बांधणी केली.  महाराष्ट्र राज्यातील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग उत्कृष्ट मराठा मंदिर स्थापत्य शैलीचे प्रदर्शन करते ज्यामध्ये आपल्याला पाच-स्तरीय शिखर पाहायला मिळते. 

5 - त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग:

नाशिकपासून थोड्याच अंतरावर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग असून या मंदिराला हिंदू पौराणिक कथांमध्ये सर्वात पवित्र स्थान म्हणून ओळखले जाते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या ज्योतिर्लिंगावर ब्रह्मा, विष्णू आणि महेश अर्थात शिव यांचे प्रतिनिधित्व करणारे तीन मुखांनी परिपूर्ण आहे. गोदावरी नदीजवळ असलेले हे ज्योतिर्लिंग नयनरम्य टेकड्यांनी वेढलेले आहे. मानव जातीला मोक्ष मिळावा म्हणून अनेक शिवभक्त या ठिकाणी येऊन महादेवांचे दर्शन करतात. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)
 


सम्बन्धित सामग्री