मथुरा : विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, दोघेही मंगळवारी प्रेमानंद महाराजांना भेटण्यासाठी पोहोचले होते. तिथे प्रेमानंद महाराजांचे बोलणे ऐकताना अनुष्काही भावुक झाली. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात दर्शन घेण्यासाठी वारंवार येत असतात.
प्रेमानंद महाराजांच्या घरी गेलेल्या विराट-अनुष्काचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, ते येताच, दोघेही प्रथम महाराजांसमोर नतमस्तक होताना दिसतात आणि आशीर्वाद घेतात. त्यानंतर दोघेही महाराजांशी मोकळेपणाने बोलले. तसेच, महाराजांनीही त्यांना मार्गदर्शन केले. यापूर्वीही अनेकदा विराट आणि अनुष्का यांनी प्रेमानंद महाराजांची भेट घेतली आहे.
हेही वाचा - 'मला ते अश्रू आठवत राहतील, जे तू...' किंग कोहलीच्या निवृत्तीवर पत्नी अनुष्काची भावनिक पोस्ट
यावेळी विराट आणि अनुष्का दोघांनीही हातात गुलाबी रंगाचे अंगठीसारखे इलेक्ट्रॉनिक उपकरण घातलेले दिसले. त्याच्या या अंगठीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
ही अंगठी काय आहे?
विराट-अनुष्का देवाचा नामजप करताना दिसले. त्यांच्या बोटांमद्ये डिजिटल टॅली इलेक्ट्रॉनिक फिंगर क्लिकर रिंग घातली होती. जेव्हा विराट हात जोडून बसला होता, तेव्हा त्याच्या हातात ही अंगठी दिसत होती पण अनुष्का ती कॅमेऱ्यापासून लपवताना दिसली. व्हिडिओमध्ये विराटने अंगठ्यावर ही गुलाबी रंगाची अंगठी घातली होती. देवाच्या नामाचा जप करताना किती वेळा जप केला आहे, हे मोजण्यासाठी हे डिजिटल टॅली काउंटर किंवा इलेक्ट्रॉनिक टॅली काउंटर वापरले जाते.
अनुष्का भावुक झाली
महाराजांना भेटायला गेलेल्या अनुष्काचे डोळे त्यांचे बोलणे ऐकून भरून आले. जेव्हा प्रेमानंद महाराजांनी विचारले, तुम्ही आनंदी आहात का? त्यानंतरच अनुष्काच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अनुष्काचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
प्रेमानंद महाराजांना भेटण्यासाठी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली दोघेही अगदी साध्या लूकमध्ये आले. अनुष्काने साधा पांढऱ्या रंगाचा आणि त्यावर काळ्या रंगाचे बारीक फुला-वेलींचे डिझाईन असलेला सूट घातला होता आणि मेकअपही केला नव्हता. विराटने साध्या पँट-शर्टचा पेहराव केला होता.
हेही वाचा - ..सगळ्या पाकिस्तान्यांची वृत्ती अशीच! 'मला सचिनला मुद्दाम दुखापत करायची होती,' शोएब अख्तरने स्वतःच सांगितलं