Monday, September 01, 2025 11:02:26 AM

Champions Trophy 2025: हेच ४ संघ पोहोचणार सेमीफायनलमध्ये, दिग्गजांचा अंदाज

इंग्लंडचा केविन पीटरसन, भारताचा मुरली विजय, आकाश चोप्रा, संजय बांगर आणि दीप दास गुप्ता यांनी चॅम्पियन ट्रॉफीच्या सेमीफायनलिस्ट विषयी आपापले अंदाज व्यक्त केले आहेत.

champions trophy 2025 हेच ४ संघ पोहोचणार सेमीफायनलमध्ये दिग्गजांचा अंदाज
Champions Trophy 2025: हेच ४ संघ पोहोचणार सेमीफायनलमध्ये, दिग्गजांचा अंदाज

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला सुरूवात होण्यास काही तासांचा कालवधी राहिला आहे. या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानात होत आहे. तब्बल 8 वर्षांनंतर होणाऱ्या या प्रतिष्ठित स्पर्धेत 8 संघ विजेतेपदासाठी मैदानात झुंजणार आहेत. पाकिस्तान यजमान असल्याने सर्व सामने पाकिस्तानात होणार होते. मात्र बीसीसीआयने पाकिस्तानमध्ये टीम इंडियाला पाठवण्यास नकार दिला. यामुळे ही स्पर्धा हायब्रीड मॉडलप्रमाणे होत आहे. टीम इंडियाचे सामने हे दुबईत खेळवले जाणार आहेत.

2017 मध्ये पाकिस्तान संघाने चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. या पराभवाची परतफेड करण्यासाठी टीम इंडिया उत्सुक आहे. यादरम्यान या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये कोणते 4 संघ पोहोचू शकतील, याबाबत अंदाज दिग्गज क्रिकेटपटूंनी व्यक्त केला आहे. स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट एक्स्पर्ट पॅनेलमध्ये असलेल्या इंग्लंडचा केविन पीटरसन, भारताचा मुरली विजय, आकाश चोप्रा, संजय बांगर आणि दीप दास गुप्ता यांनी आपापले अंदाज व्यक्त केले आहेत.

 

हेही वाचा - Zaheer Khan Purchase Apartment In Mumbai: झहीर खानने मुंबईत खरेदी केले 11 कोटी रुपयांचे आलिशान अपार्टमेंट


इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसनने भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ अंतिम-4 मध्ये येतील, असे भाकीत वर्तवले आहे. तर टीम इंडियाचा सलामीचा माजी फलंदाज मुरली विजय यांच्या मते, भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे संघ सेमीफायनलमध्ये पोहोचतील.

 

हेही वाचा - IPL 2025: वेळापत्रक जाहीर, 8 संघांचे कर्णधार ठरले, पण KKR आणि DC कर्णधार कोण?

 

आकाश चोप्राने आपल्या विश्लेषणात भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान हे चार संघ सेमीफायनलमध्ये पोहचू शकतात. संजय बांगर यांनी भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या चार संघावर डाव खेळला आहे. तर दीप दास गुप्ता यांच्या मते, भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे संघ अंतिम-4 मध्ये येण्याची शक्यता आहे. दरम्यान, उद्या (ता. १८) पासून या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे.


सम्बन्धित सामग्री