नवी दिल्ली : 'मला जाणूनबुजून सचिन तेंडुलकरला मारायचे होते आणि त्याला जखमी करायचे होते,' असा धक्कादायक खुलासा एकदा शोएब अख्तरने स्वतःच केला होता. कराचीमध्ये दोन्ही देशांमधील हा तिसरा कसोटी सामना होता. आक्रमक स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या शोएब अख्तरने कबूल केले की, त्याचा हेतू सचिन तेंडुलकरला बाद करण्याचा नव्हता तर त्याला दुखावण्याचा होता.
फलंदाजीचा दिग्गज सचिन तेंडुलकर हा अनेक क्रिकेट लोककथांचा भाग आहे, ज्यामध्ये जगभरातील वेगवान गोलंदाजांसोबतच्या मनोरंजक लढायांचा देखील समावेश आहे. या 'क्रिकेटच्या देवाने' अशा अनेक लढायांवर वर्चस्व गाजवले आहे. परंतु, असे दुर्मीळ प्रसंग आले आहेत, जेव्हा गोलंदाज त्याच्यासमोर भारी पडले आहेत.
हेही वाचा - फेकू शाहबाज शरीफ.. म्हणे, दहशतवादविरोधी लढाईत पाकिस्तानचं 600 अब्ज डॉलर्सचं नुकसान! लोक म्हणाले..
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने एका क्रीडा वृत्तांकन संस्थेशी गप्पा मारताना 2006 मध्ये भारताच्या पाकिस्तान दौऱ्यादरम्यान घडलेल्या अशाच एका क्षणाची आठवण केली. कराचीमध्ये दोन्ही देशांमधील तिसरी कसोटी होती आणि आक्रमक स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या अख्तरने कबूल केले की, त्याचा हेतू सचिनला दुखापत करण्याचा होता, त्याला बाद करण्याचा नव्हता. (हे लोक असे प्रकार करतात आणि निर्लज्जपणे सांगतात देखील... पाकिस्तानचाही भारताबाबत असाच दृष्टीकोन आहे. सरळ मार्गाने लढून किंवा स्पर्धा करून पराभव झाला की, दहशतवाद पसरवून स्वतःची हीन पातळी दाखवून द्यायची.)
"मी पहिल्यांदाच हे उघड करत आहे. त्या कसोटी सामन्यात मला जाणूनबुजून सचिनला मारायचे होते. कोणत्याही किमतीवर त्या कसोटीत सचिनला जखमी करायचेच, असा माझा निर्धार होता," असे शोएब अख्तरने स्वतःच सांगितले होते.
"पाकचा कप्तान इंझमाम विकेटसमोर चेंडू टाकण्यास सांगत राहिला. पण मला सचिनला मारायचे होते. म्हणून मी त्याच्या हेल्मेटवर मारले आणि मला वाटले की, आता तो संपला आहे. पण जेव्हा मी व्हिडिओ पाहिला तेव्हा मला दिसले की, सचिनने त्याचे डोके वाचवले आहे," असे शोएब म्हणाला.
शोएब पुढे म्हणाला की, सचिनला मैदान सोडून जायला लावण्याचा त्याचा प्रयत्न सुरू असताना, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफने त्याच्या क्लिनिकल कामगिरीने भारतीय फलंदाजांना त्रास दिला.
"मी पुन्हा त्याला दुखापत करण्याचा प्रयत्न केला. पण दुसऱ्या बाजूला, आसिफच्या रूपात भारतीय फलंदाजी संगीताचा सामना करत होती," असे शोएबने सांगितले.
हेही वाचा - नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी खरी ठरेल का? भारत-पाकिस्तान आणि तिसरे महायुद्ध याबद्दलच्या भाकितांची चर्चा!
शोएब अख्चरची ही मुलाखत जुनी असली तरी, नुकत्याच झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर ही पुन्हा एकदा लोकांमध्ये चर्चेत आली आहे. पाकिस्तान भारतात दहशतवाद पसरवत असण्याचे हे मुख्य कारण आहे की, पाकिस्तान भारताला कोणत्याही पातळीवरील स्पर्धेत हरवू शकत नाही. सुरुवातीपासूनच स्वतः जिंकण्यात अपयशी ठरल्यानंतर भारतासारख्या शेजाऱ्याचा द्वेष आणि मत्सर करण्याची पाकिस्तानची मानसिकता राहिली आहे. यामुळे भारताचे जगात सभ्यता आणि संस्कृतीसाठी नाव झालेले असताना पाकिस्तानचे असभ्यता आणि खुनशी हिंसकतेशी घट्ट नाते जोडले गेले आहे. मात्र, अशा प्रकारचे वर्तन करून कोणीच पुढे जाऊ शकत नाही, हे वारंवार सिद्ध झाले आहे. उलट, भारतावर सतत जळत राहणाऱ्या आणि नसते उपद्व्याप करणाऱ्या या जळक्या शेजाऱ्याचे स्वतःचेच घर जळत आहे.