Wednesday, August 20, 2025 04:34:15 AM

Virender Sehwag: धोनीने संघातून वगळले, सेहवागने घेतला निवृत्तीचा निर्णय; म्हणाला 'क्रिकेट खेळण्याचा काय उपयोग...

वीरेंद्र सहवागने खुलासा केला की, 2007-08 मध्ये धोनीने त्याला टीममधून बाहेर केल्यानंतर तो निवृत्तीचा विचार करत होता, पण सचिन तेंडुलकरच्या सल्ल्यामुळे त्याने पुनरागमन करून 2011 विश्वचषक जिंकला.

virender sehwag धोनीने संघातून वगळले सेहवागने घेतला निवृत्तीचा निर्णय म्हणाला क्रिकेट खेळण्याचा काय उपयोग

Virender Sehwag; भारतीय क्रिकेटचा ‘नवाब ऑफ नजफगढ’ म्हणून ओळखला जाणारा वीरेंद्र सेहवाग आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी जगभर प्रसिद्ध होता. पहिल्याच चेंडूपासून चौकार-षटकारांचा पाऊस पाडणारा हा खेळाडू गोलंदाजांसाठी नेहमीच डोकेदुखी ठरायचा. मात्र, सहवागच्या कारकिर्दीत असा एक काळ आला जेव्हा त्याला संघातून बाहेर बसावे लागले आणि तो वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. या कठीण क्षणी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिलेल्या सल्ल्याने त्याचा खेळ आणि आत्मविश्वास दोन्ही वाचवले.

सेहवागने नुकताच आपल्या यूट्यूब मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला. 2007-08  मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पहिले तीन सामने खेळल्यानंतर तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले. काही काळ त्याला संघात संधीच मिळाली नाही. याच काळात त्याच्या मनात निवृत्तीचा विचार पक्का झाला. 'मी विचार केला, जेव्हा मी संघात आहे पण खेळायला मिळत नाही, तेव्हा वनडे क्रिकेट खेळण्याचा काय उपयोग?' सेहवागने सांगितले.

हेही वाचा: Suresh Raina Faces ED Probe: माजी क्रिकेटपटू सुरेश रैना ईडीच्या चौकशीत; 1xBet प्रकरणात नवीन वळण

या गोंधळलेल्या अवस्थेत तो सचिनकडे गेला. सेहवाग सांगतो, 'मी सचिनकडे जाऊन म्हटलं की मला वनडे क्रिकेटमधून निवृत्त व्हायचं आहे. तेव्हा सचिनने सांगितलं की, 1999-2000 मध्ये त्याच्याही कारकिर्दीत असा काळ आला होता. तेव्हाही तो निवृत्तीबाबत विचार करत होता, पण तो फेज निघून गेला. भावनांवर आधारित मोठे निर्णय घेऊ नकोस. अजून एक- दोन मालिका खेळून बघ, मग ठरव.'

सचिनचा हा सल्ला सहवागसाठी जीवन बदलणारा ठरला. 2008 च्या त्रिकोणी मालिकेत सहवागचे प्रदर्शन काहीसे निराशाजनक होते. पाच सामन्यांत फक्त 81 धावा. त्याच मालिकेत गौतम गंभीरने तब्बल 440 धावा केल्या, तर सचिनने 399 धावा केल्या. पण सचिनचे शब्द सहवागच्या मनात रुतून बसले होते.यानंतर सहवागने पुनरागमनासाठी आपली तयारी वाढवली. लवकरच तो संघात परतला आणि उपकर्णधारपद मिळवले. 2011 च्या विश्वचषक संघात तो महत्त्वाचा सदस्य होता. श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताने विजय मिळवत विश्वविजेतेपद पटकावले, आणि सहवाग या यशाचा साक्षीदार ठरला.

हेही वाचा: Cricket News: वनडेत विराट कोहली आणि रोहित शर्मा करणार प्रतिनिधित्व, पण... BCCI च्या अटी कोणत्या?

आज अनेक वर्षांनंतर सहवाग हे मान्य करतो की, सचिन तेंडुलकर नसता तर कदाचित त्याचा क्रिकेट प्रवास 2008 मध्येच संपला असता. धोनीने त्याला बाहेर बसवलं, तो क्षण कटू होता, पण त्यातूनच त्याने संयम, आत्मविश्वास आणि पुनरागमनाची ताकद शिकली.

क्रिकेटमध्ये उतार-चढाव हा प्रत्येक खेळाडूच्या वाट्याला येतो. मात्र, योग्य वेळी मिळालेला मार्गदर्शनाचा एक शब्दही करिअर वाचवू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे वीरेंद्र सेहवागची ही कहाणी.


 


सम्बन्धित सामग्री